चार हजार मोरांचे अस्तित्व धोक्यात

By Admin | Published: February 15, 2015 12:44 AM2015-02-15T00:44:53+5:302015-02-15T00:44:53+5:30

विलास भोसले , पाटोदा देशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे.

Four thousand peacock survival threats | चार हजार मोरांचे अस्तित्व धोक्यात

चार हजार मोरांचे अस्तित्व धोक्यात

googlenewsNext


विलास भोसले , पाटोदा
देशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव (ता. पाटोदा) येथे आहे. मात्र, नायगावची अभयारण्याची ओळखच पुसते काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. अभयारण्यातील मोरांसाठी चारा, पाण्याची सोेयच नसल्याने मोरांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळाने केवळ माणसांनाच छळले आहे असे नाही तर पक्ष्यांचेही हाल सुरू आहेत.
या अभयारण्याचा कारभार पैठण व औरंगाबाद येथील वन कार्यालयातून चालतो. त्यामुळे कारभार रामभरोसे आहे. एक वनक्षेत्रपाल व तीन वनरक्षक इतका कर्मचारी वर्ग आहे. पैकी वनरक्षकाचे एक पद रिक्त आहे. कर्मचारी अभयारण्यात २४ तास उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, ते चार-चार दिवस फिरकत नाहीत. मोरांना पाणी, चारा आहे की नाही ? हे ही जाणून घेण्याची तसदी ते घेत नाहीत. त्यामुळे मोरांचे अस्तित्वच धोक्यात आल्याची कैफियत पक्षीमित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजीव मिसाळ म्हणाले, मोरांबरोबरच अभयारण्यातील इतर प्राण्यांबाबत प्रशासन उदासिन आहे. राष्ट्रीय पक्षाचे जीवन उध्दवस्त होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
वनक्षेत्रापाल जी. एन. कांबळे म्हणाले, पाणी, खाद्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविला आहे. वरिष्ठांनाही या संदर्भात कळविले आहे.
अभयारण्यात ग्लेरेसिडीया ही विदेशी झाडे जास्त आहेत.
४उन्हाळ्यात पानगळ झाल्यानंतर उष्णता वाढते. परिणामी प्रजनन क्षमता कमी होते.
४सीताफळ, करवंद, लिंब, पिंपळ, वड अशी स्वदेशी झाडे वाढली पाहिजेत.
४गतवर्षी अभयारण्यात साडेचार हजारावर मोर होते.
४जानेवारी २०१५ मध्ये केलेल्या वन्यजीव गणनेनुसार केवळ चार हजार मोर शिल्लक आहेत.
वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मोरांना चारा, पाणी मिळत नाही. दोन वर्षांपूर्वी दुष्काळात पाणवठे, कुंड्या तयार केल्या. परंतु आता त्या फुटल्या आहेत. त्यामुळे त्यात पाणी साचत नाही. विदेशी झाडांमुळे मोरांना चारा मिळत नाही. त्यामुळे देशी प्रजातीची झाडे वाढवावीत.
- सिध्दार्थ सोनवणे, पक्षीमित्र तथा सदस्य, सेन्सिटिव्ह झोन, नायगाव

Web Title: Four thousand peacock survival threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.