नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 12:19 PM2024-08-02T12:19:45+5:302024-08-02T12:23:06+5:30

याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे अशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

Four trains running to Nanded, Tirupati were suddenly cancelled, the planning of passengers was disrupted | नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर : तांत्रिक कारणामुळे २ ते ५ ऑगस्टदरम्यानच्या नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या ४ रेल्वे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होणार आहे. याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे अशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

तांत्रिक कारणामुळे या रेल्वे रद्द
तांत्रिक कारणामुळे नांदेड-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर- तिरुपती या दोन्ही रेल्वे दि. २ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आल्या आहेत, तर तिरुपती-छत्रपती संभाजीनगर रेल्वे दि. ३ ऑगस्ट आणि छत्रपती संभाजीनगर- नांदेड रेल्वे दि. ५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.

नांदेड ते मनमाड डेमू अंशत: रद्द
रेल्वे रुळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी घेण्यात आलेल्या रोलिंग कोरिडोर ब्लॉकमुळे नांदेड ते मनमाड डेमू ३१ ऑगस्टपर्यंत नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत ही रेल्वे पूर्णा येथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड अशी धावेल, तर मनमाड ते नांदेड डेमू याच कालावधीत पूर्णा ते नांदेडदरम्यान अशतः रद्द करण्यात आली आहे. ही रेल्वे मनमाड ते पूर्णा अशी धावेल.

Web Title: Four trains running to Nanded, Tirupati were suddenly cancelled, the planning of passengers was disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.