टीव्हीवर सिनेमा पाहून चौथीतील विद्यार्थ्याने घेतला गळफास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:24 PM2018-11-22T13:24:06+5:302018-11-22T13:25:00+5:30

विकास मछिद्र पवार असे मृत मुलाचे नाव असून ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता.

Fourth standard student's suicide after watching movie on TV | टीव्हीवर सिनेमा पाहून चौथीतील विद्यार्थ्याने घेतला गळफास 

टीव्हीवर सिनेमा पाहून चौथीतील विद्यार्थ्याने घेतला गळफास 

googlenewsNext

औरंगाबाद - चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्याघरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बुधवारी सायंकाळी वाळूज परिसरातील सिडको महानगर १ येथे ही घटना घडली . विकास मछिद्र पवार असे मृत मुलाचे नाव असून ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता. सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात विकासने गळफास घेतला आणि यात त्याचा  मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,सिडको महानगर १, वाळूज परिसर येथे राहणाऱ्या मच्छिंद्र पवार यांचा विकास हा एकुलता एक मुलगा होता, त्याला दोन बहिणी आहेत. पवार हे माजी सैनिक आहेत. मच्छिंद्र पवार आणि त्यांची पत्नी येथील औद्योगिक वसाहतीत खाजगी नोकरी करतात. बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे ते कामावर गेले होते. तर विकासच्या दोन्ही बहिणी शाळेत गेल्या होत्या. विकास घरी एकटाच होता.
संध्याकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणी शाळेतून घरी आल्यावर विकासने  ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती  वडिलांना फोनवरून दिली. वडिलांनी तातडीने घरी येवून शेजारच्या मदतीने विकासला  दवाखान्यात दाखल केले . तेथील डॉक्टरांनी विकासला  तपासून  मयत घोषित केले. 

११ वर्षीय विकासने आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला. याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता. सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात विकासने गळफास घेतला आणि यात त्याचा  मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र हा अपघात आहे की आत्महत्या या दृष्टीकोनातून पोलिस याचा तपास करत आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार गणेश आंतरप हे करीत आहेत.

Web Title: Fourth standard student's suicide after watching movie on TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.