शेतकऱ्याची फसवणूक; तलाठ्यासह चौघांवर गुन्हा
By Admin | Published: May 15, 2017 11:40 PM2017-05-15T23:40:13+5:302017-05-15T23:43:15+5:30
केज : डोका गावातील शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी तलाठी, मंडळ अधिकारी व इतर दोन महिलांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : तालुक्यातील डोका या गावातील एका ६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची बनावट कागदपत्राअधारे फसवणूक केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात संबंधित गावचा तलाठी, मंडळ अधिकारी व इतर दोन महिलांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोका येथील शिवदास महादेव भांगे या शेतकऱ्याची सर्व्हे नं. ११ मध्ये जमीन आहे. या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून सत्यभामा भीमराव केदार, शालूबाई शिवदास भांगे (रा.डोका ता.केज) यांच्यासह संबंधित गावचा तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी संगनमताने फसवणूक केली.
फसवणुकीची ही घटना २० फेब्रुवारी २०१३ ते ९ डिसेंबर २०१५ या कालावधीत केज तहसील कार्यालयात घडली, असे भांगे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले असून, या प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस तपास करीत आहेत.