किसान सन्मान योजनेत बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 03:00 PM2020-10-09T15:00:24+5:302020-10-09T15:01:11+5:30
किसान सन्मान योजनेत अंतिम सर्वेक्षणात अपात्र ठरलेल्या ४०१ लाभार्थींच्या खात्यावर तब्बल ३५ लाखांची रक्कम हप्त्याच्या स्वरूपात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : किसान सन्मान योजनेत अंतिम सर्वेक्षणात अपात्र ठरलेल्या ४०१ लाभार्थींच्या खात्यावर तब्बल ३५ लाखांची रक्कम हप्त्याच्या स्वरूपात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
किसान सन्मान योजनेत एकाच घरातील पती- पत्नी, करदाते आणि शासकीय नोकरदार बोगस कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्र सादर करून लाभ घेत आहेत. प्रशासनाने केलेल्या अंतिम सर्व्हेक्षणात सोयगाव तालुक्यातील ४०१ बोगस लाभार्थी समोर आले आहेत. या बोगस लाभार्थींच्या खात्यावर सुमारे ३५ लाख रूपये जमा झाल्याचे आढळून आले. या सगळ्यांना प्रशासनाने नोटीस बजावली असून दि. १२ ते १६ ऑक्टोबरदरम्यान सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कागदपत्रांच्या फेरतपासणीनंतर कोणी लाभार्थी पात्र ठरला तर त्याला लाभार्थी घोषित केला जाईल. तसेच अपात्र ठरलेल्या लाभार्थींकडून योजनेचा निधी परत घेतला जाणार आहे, असे सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.