केंद्र व राज्यातील सरकारकडून फसव्या योजना -अमिता चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:08 AM2017-10-28T01:08:56+5:302017-10-28T01:08:56+5:30
केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांना वेठीस धरणारी असून विकास कामांऐवजी फसव्या योजना जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न सुरू आहे़ काँग्रेसने विकासकामे करून दाखविली आहे, असे प्रतिपादन आ़अमिता चव्हाण यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांना वेठीस धरणारी असून विकास कामांऐवजी फसव्या योजना जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न सुरू आहे़ काँग्रेसने विकासकामे करून दाखविली आहे, असे प्रतिपादन आ़अमिता चव्हाण यांनी केले़
कामठा बु़ येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती शिला निखाते, तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, युवक काँग्रेसचे पप्पू पाटील कौठेकर, सभापती मंगला स्वामी, जि़प़सदस्या अटकोरे, गटविकास अधिकारी केशव पांढरे, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, रणजीतसिंह कामठेकर, उपसरपंच शंकर बरगळ, चंद्रकांत सोमवारे उपस्थित होते़
प्रास्ताविक सरपंच पिंटू स्वामी यांनी केले़ यावेळी आ़ चव्हाण यांच्या हस्ते डिजिटल अंगणवाडीचेही उद्घाटन करण्यात आले़ कार्यक्रमासाठी मारोती दासे, प्रभू कल्याणकर, शिवाजी वाघमारे, संभाजी दासे, हरदीपसिंघ कामठेकर, किशन मुस्तरे, सोमनाथ मुस्तरे, देवीदास मुस्तरे यांनी परिश्रम घेतले़