खोटे दस्तावेज दाखवून फसवणूक; गुन्हा दाखल
By Admin | Published: November 24, 2014 11:59 AM2014-11-24T11:59:41+5:302014-11-24T12:40:03+5:30
शहरातील मोकळी जागा विकत घेतलेली दाखवून खरेदीखत करीत संगनमत करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी: शहरातील मोकळी जागा विकत घेतलेली दाखवून खरेदीखत करीत संगनमत करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील विसावा कॉर्नर पाथरी रोड येथे वार्ड क्रमांक १३ मधील सर्व्हे नं.६२९ या भूखंडावर अतिक्रमण केले असून या जागेचे खोटे दस्ताऐवज बनवून व खरेदीखत तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला, अशी फिर्याद बालासाहेब श्रीरंग सामाले (रा. योगसेन, कॉलनी) यांनी दिली आहे. यात सिद्दीकी भाई अहेमद भाई मोदी, शेख शब्बीर शेख रशीद, हर्षद नर्सीकर व दुय्यम निबंधक एस. एस. कुरेशी यांनी खोटे दस्ताऐवज तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. तपास घोडके करीत आहेत.(/प्रतिनिधी)