१२० गोरगरीब कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:05 AM2021-05-10T04:05:12+5:302021-05-10T04:05:12+5:30
जायकवाडी : एमआयडीसी पैठण येथील सेंट पॉल्स ट्रस्टच्या वतीने गोरगरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या १२० कुटुंबीयांना मोफत महिनाभर पुरेल एवढे ...
जायकवाडी : एमआयडीसी पैठण येथील सेंट पॉल्स ट्रस्टच्या वतीने गोरगरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या १२० कुटुंबीयांना मोफत महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य फादर डॉ. व्हेलेरियन फर्नांडीस यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कोरोना काळात हा आधार मिळाल्याने गोरगरिबांनी ट्रस्टचे आभार मानले.
मागील वर्षीही लॉकडाऊन काळात सेंट पॉल्स मिशन ट्रस्टने पैठण औद्योगिक वसाहतीत रोजंदारीवर पोट असलेल्या गोरगरीब १०० कुटुंबांना शोधून त्यांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य वितरित केले होते. यावर्षी सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने ट्रस्टचे अध्यक्ष फादर डॉ. व्हेलेरियन फर्नांडिस यांनी मदतीचा हात पुढे केला. मुधलवाडी, पिंपळवाडी, पाडोळी, ईसारवाडी, ढोरकीन, गेवराई बार्शी, नारळा, लोहगाव, करंजखेडा, गणेशनगर, राहुलनगर औद्योगिक वसाहतसह आसपासच्या परिसरातील १२० गरजू कुटुंबातील लोकांना प्रत्येकी ३० किलो अन्नधान्य वितरित केले आहे. या मदतीमुळे गोरगरीब कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी मोठाच हातभार लागणार आहे. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिलीप रक्षे, श्यामवेल रूपेकर, प्रसाद रणपिसे, सेंट पॉल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रभाकर बांगर, पर्यवेक्षक बाळासाहेब थोटे यांनी पुढाकार घेतला.
फोटो कॅप्शन : गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करताना सेंट पॉल्स मिशन चर्च ट्रस्टचे फादर डॉ व्हेलेरियन फर्नांडीस व सहकारी.
090521\img-20210509-wa0047.jpg
गोरगरीबांना अन्नधान्य वाटप करताना सेंट पॉल्स मिशन चर्च ट्रस्टचे फादर डॉ व्हेलेरियन फर्नांडीस व सहकारी.