सिंचन अनुशेषाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:37 AM2017-11-12T00:37:57+5:302017-11-12T00:38:13+5:30

जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

Free the path of irrigation | सिंचन अनुशेषाचा मार्ग मोकळा

सिंचन अनुशेषाचा मार्ग मोकळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा लढा मागील तीन वर्षांपासून लढणारे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यात १0 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिला असून घोटा व सेनगाव येथील बंधाºयांची कामेही सुरू झाल्याचे सांगण्यात आले.
आ.तान्हाजी मुटकुळे यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, प्रा.दुर्गादास साकळे, के.के.शिंदे, फुलाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.
मुटकुळे म्हणाले, मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाकडे शासन व राज्यपाल महोदयांचे लक्ष वेधलेजात आहे. सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अनुशेष दूर करण्यासाठी सहकार्य करीत होते. त्यांनी साथ दिल्यानेच या अनुशेषातील अडसर दूर झाला आहे. त्याला राज्यपालांनी मंजीर दिली आहे. मात्र आता त्यातील प्रत्यक्ष कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यपालांनी या आर्थिक वर्षात मराठवाडा विभागाच्या योजनेतून दहा कोटी रुपयांची तरतूद करण्याचा आदेश जलसंपदा विभागास दिला आहे.
१९९९ ला परभणी जिल्ह्याचे विभाजन होवून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. तेव्हापासून रखडत पडलेला सिंचन अनुशेषाचा हा मुद्दा खºया अर्थाने निकाली निघाला आहे. अनुशेष शिल्लक असतानाही कोणताच मोठा प्रकल्प करणे शक्य नव्हते. इतरही कामे होत नव्हती. मात्र आता अनेक कामे पुढील काही वर्षांत टप्प्या-टप्प्याने होणार आहेत. सध्या ६६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. आणखी १५ हजार हेक्टर सिंचन वाढणार आहे.अनुशेषामध्ये सेनगाव, घोटा, नर्सी नामदेव, इडोळी, खरबी, हिंगोली, समगा, दुर्गधामणी, टाकळगव्हाण, शेवाळा आणि चिखली आदी ठिकाणी कयाधूवर यामधून बंधारे प्रस्तावित करण्यात आलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर इतरही अनेक कामांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Free the path of irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.