कृषीला मोफत वीज अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:49 AM2018-01-10T00:49:09+5:302018-01-10T00:49:15+5:30

तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.

 Free power to agriculture is impossible | कृषीला मोफत वीज अशक्य

कृषीला मोफत वीज अशक्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात दुप्पट कृषिपंप आहेत. तेलंगणामध्ये २३ लाख, तर महाराष्ट्रात ४३ लाख कृषिपंप आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा देणे हे आपल्या राज्याला परवडणारे नाही, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
पत्रकारांशी बोलताना गणेशकर म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळातील अवघ्या दोन जिल्ह्यांमध्ये कृषिपंपांची थकबाकी २३६५ कोटी रुपये एवढी आहे. यापैकी ११९८ कोटी ही थकबाकीची मूळ रक्कम आहे. थकबाकी वसुलीसाठी शासनाने अनेक योजना आणल्या; परंतु शेतकºयांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. आपल्या राज्यात कृषिपंपांची संख्या मोठी असल्यामुळे मोफत वीज देणे परवडणारे नाही.
शहरातही वीज चोरी आणि थकबाकी वसुलीबाबत मोहीम राबविण्यात आली. तेव्हा २ लाख वीज चोरी व सदोष मीटर आढळले, यांना महावितरणने ८० लाख रुपयांचे वीज बिल आकारले आहे.
शोधमोहिमेत अनेक वीज ग्राहक गायब असल्याची बाबही समोर आली आहे. शहरात सध्या १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असणारे २२५५ ग्राहक आहेत. यांच्याकडे ४३ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
यापैकी २५२ ग्राहकांकडून अवघी २ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. उर्वरित ९७४ ग्राहकांकडे १७ कोटी ७० लाखांची थकबाकी असून, या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. १६५ ग्राहकांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, यांच्याकडे ३ कोटी ७४ लाख रुपयांची थकबाकी आहे. असे असले तरी ८६४ ग्राहक हे सापडतच नाहीत. यांच्याकडे १९ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
महावितरणच्या कर्मचाºयांनी सुरू केलेली ग्राहकांची शोधमोहीम ही २० जानेवारीपर्यंत सुरू राहील. त्यानंतर मात्र शहरातील वीज ग्राहकांचे सविस्तर पत्ते नोंद करण्याची मोहीम राबविण्यात येईल. ज्यामुळे यापुढे गायब ग्राहकांची संख्या कमी होईल. त्यांना वीज बिल वेळेवर व नियमित मिळेल.
विद्युत सुरक्षा सप्ताह
औरंगाबाद परिमंडळामध्ये ११ ते १८ जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ११ जानेवा रोजी शहरात भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या सप्ताहामध्ये विद्युत सुरक्षा संदेश पुस्तिकेचे विमोचन केले जाईल. दोन्ही जिल्ह्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना यासंबंधीची ३० मिनिटांची चित्रफीत दाखवली जाईल.

Web Title:  Free power to agriculture is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.