मोफत टँकरचे धोरण मनपाने केले बंद

By Admin | Published: September 20, 2014 12:14 AM2014-09-20T00:14:40+5:302014-09-20T00:27:55+5:30

औरंगाबाद : शहर व गुंठेवारी वसाहतींमध्ये १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. मोफत टँकर बंद आहेत.

The free tanker policy has been closed | मोफत टँकरचे धोरण मनपाने केले बंद

मोफत टँकरचे धोरण मनपाने केले बंद

googlenewsNext

औरंगाबाद : शहर व गुंठेवारी वसाहतींमध्ये १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पाणीपुरवठा सुरू केला आहे. २० दिवसांपासून मोफत देण्यात येणारे टँकर कंपनीने बंद केल्यामुळे नागरिक आंदोलन करीत आहेत. आज टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी मिलिंदनगर भागातील हिराबाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले. १५ दिवसांपासून टँकर येत नसल्याची तक्रार उपोषणकर्त्यांनी केली. उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, प्रकाश जावळे यांनी मध्यस्थी करून उपोषण सोडले.
वसाहतींचे पत्ते, मार्ग आणि टँकर पाठविण्याच्या वेळा माहीत नसल्यामुळे कंपनीने नेमलेले टँकर वेळेत जात नसल्याची ओरड सुरू आहे. पालिकेच्या टँकरचे काय झाले, गुंठेवारी वसाहतींसाठी स्वतंत्र सेल सुरू केला आहे काय, याबाबत पालिकेतून आणि कंपनीकडून कुणीही माहिती देण्यास तयार नाही. गुंठेवारी वसाहतींत आणि मोफत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे धोरण कंपनीने अजून तरी ठरविलेले नाही.
टँकर महागणार काय, कंपनी वेळेत पाणीपुरवठा करणार की नाही, यासारखे अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. रोज ३० वसाहतींना ३ एमएलडी म्हणजेच ३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने होतो. ३० वॉर्डांतील सुमारे ५० हजार नागरिक टँकरचे पाणी पितात. एक टँकर ८ फेऱ्या मारीत असल्याची नोंद मनपा दप्तरी आहे.
शहरातील सुमारे ५० हजार नागरिक टँकरवरून पिण्याचे पाणी भरतात. प्रभाग ‘अ’ व ‘ड’ मधील पडेगाव, मिटमिटा, पेठेनगर, खुशबू कॉलनी, पहाडसिंगपुरा, हर्सूल, हिमायतबाग या भागांत टँकरने पाणीपुरवठा होतो. प्रभाग ‘ब’ व ‘क’ मधील मिसारवाडी, जाधववाडी, म्हसोबानगर, भगतसिंगनगर, केशरदीप, छत्रपतीनगर, माऊलीनगरमध्ये, तर प्रभाग ‘ई’ व ‘फ’ मधील जयभवानीनगर, गुरुदत्तनगर, रामनगर, रेणुकानगर, आनंदनगर, अबरार कॉलनी, महूनगर, गणेशनगर, हनुमानगर, संतोषीमातानगर, गारखेडा परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो.

Web Title: The free tanker policy has been closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.