शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:32 PM2019-05-29T23:32:21+5:302019-05-29T23:32:59+5:30

शहरातील सुमारे ४६० अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत महापालिका शिक्षण विभागाकडे ८ लाखांपैकी ६ लाख ५० हजार पुस्तके प्राप्त झाली आहेत. आगामी दोन दिवसांत उर्वरित पुस्तकेही प्राप्त होणार आहेत. त्यानंतर १ जूनपासून ही पुस्तके शाळांना वितरित करण्यात येणार आहेत.

Free textbooks for students on the first day of school | शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील सुमारे ४६० अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यासाठी राज्याच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत महापालिका शिक्षण विभागाकडे ८ लाखांपैकी ६ लाख ५० हजार पुस्तके प्राप्त झाली आहेत. आगामी दोन दिवसांत उर्वरित पुस्तकेही प्राप्त होणार आहेत. त्यानंतर १ जूनपासून ही पुस्तके शाळांना वितरित करण्यात येणार आहेत.
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळांमधील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. औरंगाबाद शहरात पालिकेच्या ७२ शाळांसह एकूण ४६० अनुदानित शाळा आहेत. या शाळांतील सर्व मुली आणि मागास प्रवर्गातील मुलांना मोफत पुस्तके यंदाही दिली जाणार आहेत. या शाळांत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३९ हजार आहे. त्यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने ८ लाख ९ हजार ९८० पाठ्यपुस्तकांची मागणी केली होती. आतापर्यंत ६ लाख ७० हजार पुस्तकांचा साठा प्राप्त झाला आहे. उर्वरित पुस्तके दोन ते तीन दिवसांत प्राप्त होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने १ जूनपासून ही पुस्तके त्या त्या शाळांना वितरित करण्याची तयारी केली आहे. यंदा १७ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्याचे नियोजन केले जात आहे.
पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव
पालिकेच्या शाळा १७ जूनपासून सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे. या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाईल. त्याच दिवशी त्यांना मोफत पुस्तके दिली जातील, असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.
४६०- अनुदानित शाळा
१,३९,००० विद्यार्थिसंख्या
८,०९, ००० पाठ्यपुस्तके
६, ७०, ००० पुस्तके प्राप्त
--------------------------------------

Web Title: Free textbooks for students on the first day of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.