श्वानांसाठी केले मोफत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:06 AM2021-03-13T04:06:17+5:302021-03-13T04:06:17+5:30
दि. ७ मार्च रोजी दर्गा परिसरातील मोकळ्या मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक श्वानप्रेमी आपल्या परिसरातील भटक्या श्वानांना घेऊन ...
दि. ७ मार्च रोजी दर्गा परिसरातील मोकळ्या मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक श्वानप्रेमी आपल्या परिसरातील भटक्या श्वानांना घेऊन लसीकरणासाठी आले होते. शिबिरादरम्यान एकूण ५२ श्वानांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्यांना ॲण्टि रेबीज, जंतुनाशके या लसी देण्यात आल्या. हल्ली श्वानांमध्ये वाढत्या पर्वो व्हायरसचे प्रमाण लक्षात घेऊन ४ महिन्यांखालील पिल्लांना ७ इन १ लस देण्यात आली. यामुळे श्वानांना विविध आजारांपासून संरक्षण तर मिळतेच, पण श्वान चावल्याने होणाऱ्या संक्रमणापासूनही मनुष्याचा बचाव होऊ शकतो.
प्रताप धोपते, डॉ. आदिल कादरी, डॉ. राजशेखर दादके, डॉ. अनिल भादेकर, डॉ. निलेश जाधव यांच्या हस्ते श्वानांचे लसीकरण झाले. संस्थेच्या अध्यक्ष बेरील सँचीस तसेच पूर्वी बॅनर्जी, संदीप बॅनर्जी, क्षमा कुरे, मोनिका काळे, नीरू लोया, किशोर बागुल, साधना कानडे यांच्यासह सर्वच सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
फोटो ओळ :
औरंगाबाद पेट लव्हर्स असाेसिएशनतर्फे आयोजित उपक्रमात श्वानांचे लसीकरण करताना डॉक्टर.