स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा मार्गाचा ऱ्हद्य नामकरण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 06:44 PM2024-07-07T18:44:20+5:302024-07-07T18:45:18+5:30

एमजीएम ते चिश्तीया चौक मार्गाचे ‘स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा मार्ग’ असे नामकरण करण्यात आले आहे.

Freedom Fighter Jawaharlal Darda's name given to MGM-Chishtiya chouk road | स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा मार्गाचा ऱ्हद्य नामकरण सोहळा

स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा मार्गाचा ऱ्हद्य नामकरण सोहळा

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी मंत्री, ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा (Jawaharlal Darda) उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त एमजीएम ते चिश्तीया चौक मार्गाचे ‘स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा मार्ग’ असे नामकरण रविवारी(दि.7) सकाळी एका हृद्य समारंभात करण्यात आले.

हा सोहळा खासदार संदीपान भुमरे, अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण व ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ज़िल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा, विनोद पाटील, ऋषिकेश प्रदीप जैस्वाल, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, लोकमत समूहातील सहकारी आदींच्या उपस्थितीत पार पडला.

बाबूजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे दोनदा पालकमंत्री होते. ते उद्योगमंत्री असताना त्यांच्याच काळात बजाज ऑटो या शहरात आले. त्यांच्या योगदानाचे स्मरण म्हणून शहरातील एका महत्त्वाच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

छायाचित्रांचे प्रदर्शन....

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने लोकमतच्या सभागृहात स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पाहुण्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे हे प्रदर्शन पाहिले. याच ठिकाणी पाहुण्यांचे स्वागत स्व. जवाहरलाल दर्डा यांच्यावर प्रकाशित करण्यात आलेला ‘जवाहर’ हा ग्रंथ व बुके देऊन लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा व लोकमत परिवारातर्फे करण्यात आला. तर चंद्रकांत खैरे यांनी यावेळी शाल व बुके देऊन राजेंद्र दर्डा यांचा सत्कार केला.

लोकमत भवनच्या पाठीमागील गेटजवळ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा मार्गाचे दोन फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच जवाहरलाल दर्डा यांचा फोटो व त्याखाली १९२३ ते २०२३ अशी अक्षरे लिहिलेली आहेत. पाण्याने भरलेल्या हौदात पाहुण्यांच्या हस्ते पेटत्या मेणबत्त्या ठेवून उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी दर्डा परिवारातील लोकमत सखी मंचच्या संस्थापिका आशू दर्डा, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, आर्यवीर दर्डा व अधिराज दर्डा यांचीही विशेष उपस्थिती होती. तर शहर भाजपचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील, माजी नगरसेवक महेश माळवतकर, जि. प.चे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, सिल्लोड नगर परिषदेचे गटनेते नंदू सहारे, वरुड काजीचे सरपंच दिलावर बेग, जि. प. चे माजी सभापती प्रमोद जगताप आदींचीही यावेळी उपस्थिती होती.

बाबूजींचे योगदान महाराष्ट्र विसरणार नाही...

महाराष्ट्राच्या व विशेषत: विदर्भ-मराठवाड्याच्या प्रगतीत स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. त्यांचे नाव मार्गाला देण्याची महापालिकेला संधी मिळाली. बाबूजी आमचा अभिमान व स्वाभिमान होत, अशी प्रतिक्रिया यावेळी माध्यमांजवळ देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार व मनपा आयुक्त व प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली. एमजीएम चौकातील फलकाचे अनावरण या दोघांनी केले.

Web Title: Freedom Fighter Jawaharlal Darda's name given to MGM-Chishtiya chouk road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.