धर्माच्यावर मैत्रीचा धागा; १८ व्या शतकात बाळकृष्ण महाराज, संत बनेमियाँची गाजलेली ‘दोस्ती’

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 6, 2023 08:09 AM2023-08-06T08:09:42+5:302023-08-06T08:10:52+5:30

जिवापाड प्रेम, एकमेकांच्या धर्माचा गाढा अभ्यास; बाळकृष्ण महाराजांचे मशिदीत कुराणाचे वाचन, तर बनेमियाँचे मंदिरात गीतेचे निरुपण

Friendship Day: Famous 'friendship' of Balkrishna Maharaj and Saint Banemian in 18th century in Chhatrapati Sambhajinagar | धर्माच्यावर मैत्रीचा धागा; १८ व्या शतकात बाळकृष्ण महाराज, संत बनेमियाँची गाजलेली ‘दोस्ती’

धर्माच्यावर मैत्रीचा धागा; १८ व्या शतकात बाळकृष्ण महाराज, संत बनेमियाँची गाजलेली ‘दोस्ती’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्टचा पहिला रविवार सर्व जण ‘जागतिक मैत्री दिवस’ म्हणून साजरा करतील. मात्र, याच शहरात ‘दोस्ती’ कशी असते, हे संत बाळकृष्ण महाराज व सुफी संत बनेमियाँ यांनी १८व्या शतकात दाखवून दिले. या दोघांची मैत्री त्या काळात खूप गाजली होती. बाळकृष्ण महाराजांना चार वेद मुखोद्गत होतेच, शिवाय कुराणाचा गाढा अभ्यास होता, तर बनेमियाँ हे श्रीमद् भगवद् गीतेचे निरुपण करीत.

नागेश्वरवाडीत संत बाळकृष्ण महाराजांचे मंदिर आहे, तर संत बनेमियाँचा दर्गा शहागंजात आहे. हे दोघेही अवलिया संत होते. फुलंब्रीजवळ बाबरा गावात १७३४ मध्ये जन्मलेल्या बाळकृष्ण महाराजांची कर्मभूमी छत्रपती संभाजीनगर होती. जात-पात, सोवळे-ओवळे त्यांना मान्य नव्हते. असेच संत बनेमियाँ यांचे होते. याचा उल्लेख ‘परमहंस बाळकृष्ण महाराज चरित्रा’मध्ये आहे.

लोकांना अप्रूप
बाळकृष्ण महाराज व बनेमियाँ यांची भेट पाहण्यासाठी त्या काळी लोक जमत असत, कारण हे दोन संत जेव्हा भेटत, तेव्हा ते हास्यविनोद करत आणि एकमेकांशी ज्या भाषेतून ते संवाद साधत, हे सर्वसामान्यांना लवकर कळत नसे. श्रीमद् भागवत गीता, कुराण यावर दोघांत चर्चा होई. ज्यांना यांची विद्वत्ता कळे, असे लोक दोघांचेही दर्शन घेत.

महाराजांचा कुराणचा अभ्यास
बाळकृष्ण महाराज मशिदीत कुराणाची माहिती सांगत
संत बाळकृष्ण महाराजांना चार वेदांचा अभ्यास होता, ते गायत्री उपासक होते, तसेच कुराणाचाही गाढा अभ्यास होता. ते मुस्लीम बांधवांसोबत मशिदीमध्ये नमाज अदा करीत आणि कुराणाचा अर्थही ते सांगत.
- अनुराधा जोशी, वंशज व विश्वस्त बाळकृष्ण मंदिर

गीतेचे निरूपण करत
संत बनेमियाँ श्रीमद् भागवत गीताचे निरुपण करीत
संत बनेमियाँ हे मूळचे हैदराबाद येथील होते. त्यांचा कुराणाचा जसा गाढा अभ्यास होता, तसेच श्रीमद् भागवत् गीताही त्यांना मुखपाठ होती. ते श्रीमद् भागवत् गीतेचा भावार्थ सांगत.

अंधेरा हो गया...
ज्यावेळी संत बाळकृष्ण महाराज यांचे १८२० मध्ये निधन झाले, त्यावेळेस संत बनेमियाँ यांना जिवलग मित्राच्या जाण्याचे दु:ख सहन झाले नाही. बनेमियाँ त्यावेळी शहरभर फिरत राहिले ‘अंधेरा हो गया, सब तरफ अंधेरा हो गया’ असे ते म्हणत होते.
- हभप मनोहर बुवा दीक्षित

Web Title: Friendship Day: Famous 'friendship' of Balkrishna Maharaj and Saint Banemian in 18th century in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.