शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:40 AM2017-11-04T00:40:25+5:302017-11-04T00:40:34+5:30

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास १६ शिक्षक संघटनांनी एकत्र येत ४ नोव्हेंबर रोजी जि.प.वर मोर्चा काढण्याचा निश्चय केला आहे.

Front of Teacher Coordination Committee | शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा

शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास १६ शिक्षक संघटनांनी एकत्र येत ४ नोव्हेंबर रोजी जि.प.वर मोर्चा काढण्याचा निश्चय केला आहे.
शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराचे अनेक नमुने मागील वर्षभरात अनेकदा पाहायला मिळाले. अपुरे कर्मचारी व कामचुकारपणामुळे तर कळस गाठला आहे. तर त्यातच शासनही विविध जाचक अटी आणून शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. यात जिल्ह्यातील १0 वर्षे सेवा झालेले सर्वच शिक्षक बदलीपात्र करणे, चट्टोपाध्याय वेतनश्रेणी मंजुरीसाठी अत्यंत कठीण अटी घालणे अशा बाबींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा निर्णय घेतला. ४ नोव्हेंबर रोजी जि.प.वर मोर्चा काढण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अ.म.प्रा.शिक्षक संघ, म.रा.प्रा. पदवीधर शिक्षक सभा, म.रा. शिक्षक काँगे्रस संघटना, म.रा.प्रा. शिक्षक सेना, म.रा.शिक्षक परिषद, म.जोतिबा शिक्षक परिषद, पंजबराव देशमुख शिक्षक परिषद, राष्ट्रवादी शिक्षक संघ, उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघ, म.रा. केंद्रप्रमुख संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, म.रा. प्राथमिक शिक्षक समिती, जि.प. कास्ट्राईब कर्मचारी संघटना या सोळा संघटनांनी मोर्चात सहभागी होण्याचे निश्चित केले आहे.
मोर्चेकºयांच्या मागण्यांमध्ये बारा वर्षांनंतर मिळणारी वरिष्ठ वेनश्रेणी, निवडश्रेणीबाबतचा शासन आदेश तत्काळ रद्द करा, बदल्यांबाबतच्या शासन निर्णयातील त्रुटी दूर करा, १ नोव्हेंबर २00५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांकडील आॅनलाईन माहिती भरण्याचे काम काढून घ्या, एमएससीआयटी उत्तीर्ण होण्यासाठी २0१८ पर्यंत मुदतवाढ द्या इ. मागण्या करण्यात आल्या आहेत. तर जिल्हास्तरीय मागण्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अराजपत्रित मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या करा, पूर्वीचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढा, पात्र शिक्षकांच्या पदवीधर वेतनश्रेणीच्या पदस्थापना द्या, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढा इ. मागण्या आहेत.
जि.प. बहुविध प्रशालेच्या मैदानावरून दुपारी १ वाजता निघणाºया या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनी केले आहे.

Web Title: Front of Teacher Coordination Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.