काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By Admin | Published: January 7, 2017 12:04 AM2017-01-07T00:04:36+5:302017-01-07T00:08:09+5:30
लातूर : शहर जिल्हा काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लातूर : नोटाबंदीनंतर देशात किती काळा पैसा जमा झाला, याबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला ग्रुप यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होत आहे, याची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शहर जिल्हा काँगे्रसच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नोटाबंदीनंतर देशात आर्थिक आणिबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यावर पंतप्रधानांचे मौन आहे. सर्वसामान्य जनतेवर नोटाबंदीचा परिणाम झाला असताना उपाययोजना आखल्या जात नाहीत. त्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनात पक्ष निरीक्षक ए. पी. बसवराज, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनीताताई आरळीकर, तालुका अध्यक्ष दगडूसाहेब पडिले, प्रदेश सचिव अमर खानापुरे, महापौर अॅड. दीपक सूळ, विक्रम हिप्परकर, अॅड.त्र्यंबकदास झंवर, एस. आर. देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय बनसोडे, संतोष देशमुख, सपना किसवे, रेणा कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, सर्जेराव मोरे, प्रवीण पाटील, स्मिता खानापुरे, महेश काळे, अल्ताफ शेख, रत्नदीप अजनीकर, बिरबल देवकते, नेताजी बादाडे, दगडूप्पा मिटकरी, दत्ता मस्के, राजू आकनगिरे, समद पटेल, सिंकदर पटेल, रमेशप्पा हलकुडे, चंद्रकांत धायगुडे, पृथ्वीराज सिरसाठ, केशरबाई महापुरे, उषा कांबळे, डॉ. विजय अजनीकर, बालासाहेब देशमुख आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)