राजेंद्र दर्डा यांची प्रचारात आघाडी

By Admin | Published: September 29, 2014 12:55 AM2014-09-29T00:55:11+5:302014-09-29T00:59:57+5:30

औरंगाबाद : पदयात्रांच्या धडाक्याने प्रचाराला सुरुवात करून राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

Frontier campaign of Rajendra Darda | राजेंद्र दर्डा यांची प्रचारात आघाडी

राजेंद्र दर्डा यांची प्रचारात आघाडी

googlenewsNext

औरंगाबाद : पदयात्रांच्या धडाक्याने प्रचाराला सुरुवात करून राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शनिवारच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळल्यानंतर रविवारी सकाळी राजेंद्र दर्डा यांनी मायानगर, ठाकरेनगर, राजीव गांधीनगर आणि जयभवानीनगर या भागांमध्ये पदयात्रा काढली. पदयात्रेत सहभागी झालेल्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी ८.३० वाजता राजेंद्र दर्डा जसे मायानगर भागात पोहोचले, तसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत केले. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा ठाकरेनगरात पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुख्माई मंदिरात राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबादच्या सर्वांगीण विकासासाठी राजेंद्र दर्डा यांना निवडून देण्याचे साकडे रहिवाशांनी विठ्ठलाला घातले. त्यानंतर पदयात्रा मुकुंद सोसायटी या भागात पोहोचली. परिसरातील महिलांनी राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचे दारात रांगोळी काढून स्वागत केले. तसेच राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
‘जय हो’च्या घोषणांनी आणि ढोल- ताशांच्या गजरात निघालेली पदयात्रा राजीव गांधीनगरात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील प्रत्येक घरात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले.
सकाळी ११ वाजता राजेंद्र दर्डा यांची प्रचार रॅली संत तुकोबानगरात पोहोचली. परिसरातील शेकडो कार्यकर्ते या रॅलीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पुढे कामगार चौकापासून रॅली जयभवानीनगरात पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राजेंद्र दर्डा यांनी अभिवादन केले. त्यानंतर जयभवानीनगरातील गल्ल्यांमध्ये घरोघर जाऊन राजेंद्र दर्डा यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. सकाळी ११.३० वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेत काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बायजीपुरा, इंदिरानगरात जल्लोष
राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा दुपारी ४.३० वाजता जशी बायजीपुरा भागात पोहोचली तसा युवा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यकर्ते व समर्थकांनी राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले. एमजीएम कॅम्पसपासून सुरू झालेली पदयात्रा जशी बायजीपुरा व इंदिरानगरात पुढे जात होती, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. पुढे मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. पदयात्रेदरम्यान राजेंद्र दर्डा हे प्रत्येक मतदारांशी संवाद साधत होते. अनेक घरांमध्ये जाऊन त्यांनी थोरा-मोठ्यांच्या दुवा आणि आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे महिला व युवकांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे पदयात्रा इंदिरानगर भागात पोहोचली. पदयात्रेत लहान मुलांचा उत्साहदेखील पाहण्याासारखा होता. काँग्रेसच्या विविध घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. सायंकाळी ७.४० वाजता पदयात्रेचा समारोप झाला.

Web Title: Frontier campaign of Rajendra Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.