टोस्टर, संगणक, माऊस, नरसाळ्यासह फळभाज्यांच्या निशाण्या प्रचारात आणणार रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:04 AM2021-01-02T04:04:42+5:302021-01-02T04:04:42+5:30

ग्रामपंचायत निवडणूक धुराळा : पारंपरिक ते आधुनिक १९० निवडणूक चिन्हांची चलती औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक ते आधुनिक १९० ...

Fruits and vegetables including toasters, computers, mice and nurseries | टोस्टर, संगणक, माऊस, नरसाळ्यासह फळभाज्यांच्या निशाण्या प्रचारात आणणार रंगत

टोस्टर, संगणक, माऊस, नरसाळ्यासह फळभाज्यांच्या निशाण्या प्रचारात आणणार रंगत

googlenewsNext

ग्रामपंचायत निवडणूक धुराळा : पारंपरिक ते आधुनिक १९० निवडणूक चिन्हांची चलती

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीत पारंपरिक ते आधुनिक १९० निवडणूक चिन्हांची चलती असून टोस्टर, संगणक, माऊस, पेनड्राइव्ह, ए.सी, नरसाळ्यासह फळ आणि भाज्यांच्या निशाण्या प्रचारात रंगत आणणार आहेत. दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अनेक वस्तूंना निवडणूक चिन्हे निवडणूक आयोगाने निश्चित केली आहेत. ४ जानेवारी रोजी चिन्ह वाटप होणार आहे, १९० चिन्हे असली तरी रुळलेल्या चिन्हांवर अनेकांच्या उड्या पडणार, हे मात्र निश्चित आहे.

यापूर्वीच्या निवडणुकीत ४८ निवडणूक चिन्हे असायची. या वेळच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने २६० नोंदणीकृतपैकी १६ पक्षांची चिन्हे आरक्षित केली आहेत. उर्वरित २४४ नोंदणीकृत राजकीय पक्ष, तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने ४८ ऐवजी १९० मुक्त चिन्हे निश्चित केली आहेत. आयोगाच्या २०१७ च्या अधिसूचनेनुसार ४८ चिन्हे निश्चित केली होती. नोव्हेंबर २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार १४२ नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे चिन्ह संख्या आता १९० झाली आहे.

आता व्हॅक्यूम क्लीनरही निशाणी

२०१९ पर्यंत ४८ चिन्हांची यादी होती. त्यात आधुनिक उपकरणांसह भाजी, फळे, लाकडी साहित्यासह इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश झाला आहे. ग्रामीण राजकारण एअर कंडिशनरसह व्हॅक्यूम क्लीनरदेखील प्रचारात निशाणी असणार आहे. मण्यांचा हार, ड्रील मशीन, डंबेल्स, कानातील दागिने, हेलिकॉप्टर, हेल्मेट, फणस, चावी, भेंडी, लॅपटॉप, कलिंगड, स्टेथोस्कोप आदी चिन्हांची या वेळच्या निवडणुकीत भर पडली आहे.

चौकट...

निवडणूक अधिकाऱ्यांचे मत...

सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार म्हणाल्या, आयोगानेच निवडणूक चिन्हांची यादी निश्चित केली आहे. आयोगाने दिलेल्या सूचना आणि घोषित केलेल्या चिन्हांच्या यादीनुसार उमेदवारांना चिन्हांचे वाटप होईल.

कुठल्याच पॅनलला एक चिन्ह मिळणार नाही

या निवडणुकीत चिन्हांची संख्या वाढविल्यामुळे एकाच चिन्हावर सर्वांच्या उड्या पडणार नाहीत. एकाच चिन्हाऐवजी वेगवेगळ्या चिन्हांवर आता ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार होणार आहे. निवडणूक चिन्हांमध्ये गमतीदार निशाण्यांसह प्रचार सुरू झाल्यावर मजा येणार आहे.

खाद्यपदार्थांसह फळभाज्यांची चिन्हे

अक्रोड, अननस, फणस, सूर्यफूल, भुईमूग, नारळाची बाग, द्राक्षे, हिरवी मिरची, फुलकोबी, ढोबळी मिरची, बिस्किट, सफरचंद, आइस्क्रीम, पाव, मका, नारळ, केक, ऊस, भेंडी, वाटाणे या निवडणूक चिन्हांमुळे प्रचाराची रंगत बघण्यासारखी असणार आहे.

Web Title: Fruits and vegetables including toasters, computers, mice and nurseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.