फुलंब्री शहरात २०० कुटुंबाला मिळाली हक्काची घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:02 AM2021-05-23T04:02:02+5:302021-05-23T04:02:02+5:30
फुलंब्री : नगरपंचायतीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोनशे कुटुंबांना आपले हक्काची घरे मिळाली आहेत. तर चारशे घरांची ...
फुलंब्री : नगरपंचायतीच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोनशे कुटुंबांना आपले हक्काची घरे मिळाली आहेत. तर चारशे घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. या घरांसाठी आतापर्यंत ११ कोटींचा निधी मिळालेला आहे. तर येणाऱ्या काळात आणखी ७०० घरे मंजूर करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून त्याची अंमलबजावणी तत्काळ केली जाणार आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेत गरीब नागरिकांनी त्यांची जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना घरकूल मंजूर केले जाते. त्या करिता अडीच लाखांचे अनुदान दिले जाते. लाभार्थीने तत्परता दाखविल्यास घरकुलाचे काम वेगाने पूर्ण होते. त्यांना नगरपंचायतकडून निधीचे वाटप केले जाते. ही योजना फुलंब्रीतील लाभार्थींना लाभदायक ठरू लागली आहे. आतापर्यंत दोनशे कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे.
एकत्र कुटुंबात असलेली व्यक्ती विभक्त होऊन भाड्याच्या घरात राहत होता. त्याला जागा उपलब्ध होती. पण पैसे नव्हते अशा स्थानिक रहिवासी असलेल्या कुटुंबाला या योजनेत घरे देता येतात. याचा विचार करून नगर पंचायतने अर्ज मागवून त्यांचे अर्ज मंजूर केले. आतापर्यंत १३२६ घरकुलाच्या फाईल मंजूर करण्यात आलेल्या असून दोनशे घरे प्रत्यक्ष दिली गेली आहे. तर चारशे घराचे काम प्रगतीपथावर आहे. तर उर्वरित घरकुलाचे काम लाभार्थीच्या हालचालीनुसार सुरू होईल.
---
केंद्र सरकार व राज्यसरकारच्या आर्थिक मदतीने नगर पंचायत प्रधानमंत्री घरकूल योजना राबविते. २०० घरी पूर्ण झाली आहे. तर ४०० घराची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आतापर्यंत ११ कोटी रुपयाचा निधी या घरकुलावर खर्च झालेला आहे. २०२२ पर्यंत मंजूर झालेली सर्व घरे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सुहास सिरसाठ, नगराध्यक्ष, फुलंब्री न.प.
फोटो कॅप्शन : फुलंब्री शहरात नगर पंचायतच्या वतीने पूर्ण केलेलं घरकूल.
220521\gharkul phulambri_1.jpg
फुलंब्री शहरातील घरकुलाचे काम प्रगतीपथावर