फुलंब्री तालुका झाला कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:22 AM2020-12-11T04:22:23+5:302020-12-11T04:22:23+5:30

फुलंब्री : तालुका कोरोनामुक्त झाला असून येथे असलेले दोन कोविड केअर सेंटर आजघडीला रिकामे झालेले आहे. यामुळे अनेक दिवसांनंतर ...

Fulbari taluka became corona free | फुलंब्री तालुका झाला कोरोनामुक्त

फुलंब्री तालुका झाला कोरोनामुक्त

googlenewsNext

फुलंब्री : तालुका कोरोनामुक्त झाला असून येथे असलेले दोन कोविड केअर सेंटर आजघडीला रिकामे झालेले आहे. यामुळे अनेक दिवसांनंतर नागरिक व प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे.

काटेकाेरपणे नियमांचे पालन करीत असताना तालुक्यातील बाबरा येथे पहिला कोरोना संक्रमित रुग्ण १९ मे रोजी आढळून आला होता. त्यानंतर फुलंब्री शहरात दुसरा रुग्ण आढळून आला. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत तालुक्यात एकूण ५१० कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. यातील २१ संक्रमितांचा मृत्यू झाला तर बाकीचे ४८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यात आरोग्य, महसूल व पोलीस विभागाने गेल्या दहा महिन्यांच्या काळात नागरिकांच्या सेवेत अहोरात्र काम केले. यात आरोग्य विभागाचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडून तालुक्यातील संपूर्ण नागरिकांची दोनवेळा आरोग्य तपासणी करण्यात आली. यामुळे तालुका कोरोनामुक्त होण्यास मदत मिळाली. तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे येथे असलेले दोन कोविड केअर सेंटर आजघडीला रिकामे झालेले आहे. याचा मोठा दिलासा प्रशासन व नागरिकांनाही मिळाला आहे.

कोट...

नागरिकांनी बेसावध राहू नये

नागरिकांनी बेसावध न राहता काळजी घ्यावी

तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झालेला असला तरी बेसावध राहू नये. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सुरक्षित अंतर ठेवावे. या रोगाची दुसरी लाट येऊ शकते, याची सर्वांनी काळजी घ्यावी.

डॉ. प्रसन्ना भाले, तालुका आरोग्य अधिकारी, फुलंब्री.

महिनानिहाय तालुक्यात आढळलेले रुग्ण

महिना रुग्ण

मार्च ००

एप्रिल ००

मे ०२

जून १५

जुलै ७७

ऑगस्ट १५५

सप्टेंबर १५६

ऑक्टोबर ८६

नोव्हेंबर १९

डिसेंबर ००

एकूण ५१० रुग्ण

Web Title: Fulbari taluka became corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.