पाच वर्षांनंतर फुलंब्री होणार टँकरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:04 AM2021-04-15T04:04:42+5:302021-04-15T04:04:42+5:30
फुलंब्री : तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे, तलावात मुबलक पाणीसाठा झाला. त्यामुळे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच तालुका टँकरमुक्त होणार ...
फुलंब्री : तालुक्यात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे, तलावात मुबलक पाणीसाठा झाला. त्यामुळे पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच तालुका टँकरमुक्त होणार असल्याचे चित्र आहे.
फुलंब्री तालुक्यात गेल्यावर्षी पावसाने सरासरी ओलांडत विक्रमी ८११ मि.मी पाऊस पडल्याची नोंद झाली. परिणामी मध्यम प्रकल्प, तलाव, पाझर तलाव, केटीवेअर आदी तुडुंब भरल्याने वर्षभर पुरेल असा पाणीसाठी उपलब्ध झाला. उपलब्ध पाणीसाठ्यामुळे बागायती शेती करण्यासाठी याचा लाभ होईल. गेल्या सात महिन्यांच्या काळात धरणे, तलावांतील पाणीसाठा थोड्या फार प्रमाणात कमी झालेला असला तरी, आगामी चार महिने पुरेल इतका पाणीसाठा आज उपलब्ध आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे.
उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यामुळे टँकरवर होणार खर्च कमी होईल. तालुक्यात २०१७ मध्ये ६५, २०१८ मध्ये ९४, तर २०१९ मध्ये १२४ टँकरने तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र यंदा तशी परिस्थिती नसल्याने टँकरवर होणार लाखो रुपयांचा खर्च यंदा होणार नाही. तालुक्यातील एकाही गावातून आजपर्यंत पाणी टंचाईसंदर्भात तक्रार किंवा विहीर अधिग्रहणची मागणी पंचायत समितीकडे आलेली नाही.
--------
फुलंब्री तालुक्यामधील उपलब्ध पाणीसाठी
फुलंब्री मध्यम प्रकल्प ५० टक्के
वाकोद मध्यम प्रकल्प ३२ टक्के
सांजूळ मध्यम प्रकल्प ३९ टक्के
जातेगाव तलाव २० टक्के
गणोरी तलाव १४ टक्के
---
फोटो :
फुलंब्री मध्यम प्रकल्पातील उपलब्ध असलेला पाणीसाठा.
140421\rauf usman shaik_img-20210414-wa0035_1.jpg
प्रकल्प