‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:04 AM2021-09-25T04:04:22+5:302021-09-25T04:04:22+5:30

औरंगाबाद : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत ...

A full program on the occasion of 'Azadi Ka Amritmahotsav' | ‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त भरगच्च कार्यक्रम

‘आझादी का अमृतमहोत्सव’निमित्त भरगच्च कार्यक्रम

googlenewsNext

औरंगाबाद : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि महानगरपालिका यांच्यातर्फे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत जनसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालये, एनजीओ, शासकीय आणि खाजगी संस्थांचा सहभाग या उपक्रमात अपेक्षित आहे.

२ ऑक्टोबर रोजी या महोत्सवाच्या निमित्ताने सायकल रॅली आणि फ्रीडम वॉकचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियाना अंतर्गत ‘स्वच्छता’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. कॅनॉट परिसरात स्ट्रीटस् फॉर पीपल, सेंट्रल नाका ते एमजीएम आणि सलीम अली सरोवर ते टीव्ही सेंटर रोडवर सायकल फॉर चेंज म्हणजेच सायकलिंग ट्रॅकची निर्मिती, खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत खाम नदी परिसरात खेळाचे मैदान बनवणे, वृक्षारोपण करणे, नदी काठावर स्ट्रीट लाईट बसवणे, पेंट युवर सिटी अंतर्गत खाम नदीकाठी वसलेल्या घरांच्या बाहेरील भिंती रंगवणे, महानगरपालिकेच्या जलकुंभाची रंगरंगोटी करणे, पेंट युवर स्ट्रीट अंतर्गत शहरातील रस्ते आणि चौक येथे रंगरंगोटी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर आणि घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यांची रंगरंगोटी करणे आदी समावेश आहे. प्रत्येक उपक्रमानुसार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे उपक्रम राबवले जाणार आहेत.

राष्ट्रगान उपक्रम

२ ऑक्टोबरला सकाळी ७.५० वाजता शहरातील नागरिक सन्मानाने उभे राहून भारताचे राष्ट्रगीत म्हणतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत राष्ट्रगीत शक्य नसल्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर आपल्या राष्ट्रगीताचा व्हिडिओ पोस्ट करावा. त्यातून किती नागरिक उपक्रमात सामील झाले, याची हे तपासण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.

Web Title: A full program on the occasion of 'Azadi Ka Amritmahotsav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.