मस्ती की पाठशाला! IAS प्रशासकांना आठवले बालपण, शाळेत टायर गाडा खेळात सहभाग

By मुजीब देवणीकर | Published: November 9, 2023 01:28 PM2023-11-09T13:28:13+5:302023-11-09T13:31:31+5:30

मनपाच्या प्रियदर्शनी शाळेत ‘मस्ती की पाठशाला’, दिवाळी स्नेह मिलन

Fun or lessons! Administrators IAS G. Shrikant remembered their childhood, participating in tire cart games at the municipal school | मस्ती की पाठशाला! IAS प्रशासकांना आठवले बालपण, शाळेत टायर गाडा खेळात सहभाग

मस्ती की पाठशाला! IAS प्रशासकांना आठवले बालपण, शाळेत टायर गाडा खेळात सहभाग

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या गारखेड्यातील प्रियदर्शनी विद्यालयात बुधवारी लायन्स क्लब टायटन्सच्या मदतीने ‘मस्ती की पाठशाळा’ आणि दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी देशी खेळांमध्ये टायर गाडा, गोट्या खेळणे, दोरीवरील उड्या, पालकांसाठी लिंबू चमचा, संगीत खुर्ची, रनिंग स्पर्धा घेण्यात आल्या. प्रशासक जी. श्रीकांत यांनाही विविध खेळ पाहून बालपण आठवले. त्यांनीही एक टायर घेऊन विद्यार्थ्यांसोबत शर्यत खेळली.

या अनोख्या उपक्रमासाठी उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त अंकुश पांढरे, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनील देसरडा, अध्यक्ष कपिल बाकलीवाल, शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे, नियंत्रण अधिकारी गणेश दांडगे, विस्तार अधिकारी रामनाथ थोरे, ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक संजीव सोनार, कुणाल बाकलीवाल, ऋत्विक अग्रवाल, आदित्य कासलीवाल, सौरभ खिंवसरा, रोहित गंगवाल आदी उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लबतर्फे विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. सीबीएसई उस्मानपुरा शाळेतरील चिमुकल्यांनी ‘मोबाइल नको वृक्ष हवा’ या पथनाट्याचे सादरीकरण केले. यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत उबाळे, शोभा पवार, बाबू राठोड, बाळू जाधव, मनीषा नगरकर, मोनिका चव्हाण, वैशाली चव्हाण, सुनीता जोशी, मीरा मोरे, वंदना पवार, प्रकाश इंगळे, संगीता चौधरी, किरण पवार, सूर्यमाला जाधवर आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. संचालन तेजस्विनी देसले यांनी केले.

Web Title: Fun or lessons! Administrators IAS G. Shrikant remembered their childhood, participating in tire cart games at the municipal school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.