क्लस्टरची व्याप्ती वाढवून रोजगार निर्मितीसाठी निधीची तरतूद करणार- डॉ. भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:07+5:302021-09-19T04:04:07+5:30

वाळूज महानगर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या क्लस्टरची व्याप्ती वाढवून रोजगार निर्मितीसाठी निधीची तरतूद करणार असल्याचे ...

Funds will be provided for job creation by expanding the scope of the cluster. Bhagwat Karad | क्लस्टरची व्याप्ती वाढवून रोजगार निर्मितीसाठी निधीची तरतूद करणार- डॉ. भागवत कराड

क्लस्टरची व्याप्ती वाढवून रोजगार निर्मितीसाठी निधीची तरतूद करणार- डॉ. भागवत कराड

googlenewsNext

वाळूज महानगर : ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या क्लस्टरची व्याप्ती वाढवून रोजगार निर्मितीसाठी निधीची तरतूद करणार असल्याचे केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी वाळूज येथे आयोजित कार्यक्रमात केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारत लॉन्स येथे शनिवारी सेवा सर्मपण अभियान अंतर्गत विविध योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. प्रशांत बंब होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.चे उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य पुष्पा काळे, लोकविकास बँकेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, माजी सभापती ज्योती गायकवाड, सरपंच सईदाबी पठाण, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, कृष्णा सुकासे, लता मालुसरे, शिवप्रसाद अग्रवाल, नंदकुमार गांधिले, शिवनाथ मालकर, जे.बी. पवार आदींची उपस्थिती होती.

या मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. भागवत कराड म्हणाले की, शहराप्रमाणे ग्रामीण भागाचा विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाच्यावतीने क्लस्टरच्या माध्यमातून विविध विकासाची कामे केली जात आहेत. क्लस्टरची व्याप्ती वाढवून रोजगार निर्मितीसाठी निधीची तरतूद करणार असल्याचे ते म्हणाले. आ. प्रशांत बंब यांनी महिला बचत गटांना सक्षम करून त्यांना विविध उद्योग सुरू करण्यासाठी बँकेमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यात पीएमजेएसवाय, पीएमईजीपी, महिला बचत गटांना कर्ज व अनुदान वाटप, शेतकरी गटांना ट्रॅक्टरचे वितरण तसेच विविध शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले, तर शिवप्रसाद अग्रवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रामेश्वर मालुसरे, डॉ.सी.टी. पवार, जनार्धन गांधिले, योगेश दळवी, सिराज पटे, अरुण गायकवाड, शाहीन शेख, अंकुश गायकवाड, रतन पठारे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

फोटो ओळ- वाळूज येथे सेवा समर्पण सप्ताहात विविध लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड. सोबत आ. प्रशांत बंब, एल.जी. गायकवाड, ज्योती गायकवाड, अविनाश गायकवाड आदी दिसत आहेत.

फोटो क्रमांक- वाटप १/२/३

-----------------------

Web Title: Funds will be provided for job creation by expanding the scope of the cluster. Bhagwat Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.