मनसेच्या महापालिकेतील आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 07:45 PM2020-06-26T19:45:20+5:302020-06-26T19:50:36+5:30
, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळा मात्र सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाला
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी दुपारी महापालिकेत शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आक्रमक होत महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यावर खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना शांत केले. मात्र यादरम्यान झालेल्या गोंधळाने सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाला.
शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचा आकडासुद्धा चिंतनीय आहे. या मागे महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. याबाबत एका शिष्टमंडळाने महापालिकेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांची भेट घेतली. चर्चे दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी आरोपांवर खुलासा मागितला. तसेच आक्रमक होत त्यांनी निकम यांच्यावर खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. लागलीच कार्यकर्त्यांनीसुद्धा घोषणाबाजी सुरु केली. यामुळे एकच गोंधळ उडला, पोलिसांनी दाशरथे यांना अडवले. तसेच कार्यर्त्यांना शांत केले. यामुळे तणाव निवळा मात्र सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाल्याचे चित्र होते.