वातावरणीय बदलामुळे भविष्य खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:44 AM2017-10-26T00:44:30+5:302017-10-26T00:44:35+5:30

वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही.

Future Predictions due to Climate Change | वातावरणीय बदलामुळे भविष्य खडतर

वातावरणीय बदलामुळे भविष्य खडतर

googlenewsNext

अनुराग पोवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वातावरणीय बदलामुळे मागील काही वर्षांत पर्जन्यमानात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच पार पडलेला पावसाळाही याला अपवाद नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९५५.५५ मिमी असताना या पावसाळ्यात जवळपास निम्मा म्हणजेच ६६ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात नांदेड जिल्ह्यातील तापमान पुढील काही वर्षांत वाढत जाणार असून २२ ते २६ ठिकाणी सातत्याने अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे.
जिल्ह्यात यंदा ६६ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पडणाºया किनवट आणि माहूर तालुक्यात मात्र यंदा सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाल्याने ५० टक्क्यांहून अधिक सरासरी पावसाने गाठली असली तरी हा पाऊस समप्रमाणात झालेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ९८.६३ टक्के पाऊस मुदखेड तालुक्यात तर त्या खालोखाल ९२.३० टक्के पाऊस हा नांदेड तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारे किनवट आणि माहूर हे दोन तालुके आहेत. या दोन तालुक्यांची वार्षिक सरासरी प्रत्येकी १२४० मिमी इतकी आहे; पण या दोन्ही तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमीच पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात ६०१.९८ मिमी म्हणजेच ४८.५५ टक्के तर माहूर तालुक्यात ५००.९२ मिमी पाऊस झाला. या पावसाची सरासरी केवळ ४० टक्के भरली आहे. देगलूर तालुक्यातही वार्षिक सरासरीच्या केवळ ५१.३० टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यात वार्षिक ९००.३० मिमी सरासरीपैकी ४६१.८२ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये अर्धापूर-७८.८४ टक्के, भोकर-७०.७३, उमरी-६७.३१, कंधार-७५.५४, लोहा-७३.४४, हदगाव-६६.३१, हिमायतनगर-५५.९२, बिलोली-६४.०८, धर्माबाद-६१.५६, नायगाव-६६.४ टक्के आणि मुखेड तालुक्यात ७३.८४ टक्के वार्षिक सरासरीच्या पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा नांदेड तालुक्यात सर्वाधिक चार वेळा अतिवृष्टी झाली. तर मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव आणि मुखेड तालुक्यात प्रत्येकी एकवेळ अतिवृष्टी म्हणजेच २४ तासांत ६५ मिमीहून अधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. त्याचवेळी किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांत मात्र एकदाही अतिवृष्टीची नोंद झाली नसल्याचे यावर्षीची पावसाची आकडेवारी सांगते.

Web Title: Future Predictions due to Climate Change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.