G20 Summit: बाय ॲण्ड थँक्स लॉट...छत्रपती संभाजीनगर; महिला प्रतिनिधींनी मानले आभार

By विकास राऊत | Published: March 2, 2023 02:02 PM2023-03-02T14:02:46+5:302023-03-02T14:03:22+5:30

जी-२० बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे कौतुकास्पद आदरातिथ्य प्रशासनाने केले होते.

G20 Summit: Bye and Thanks Lot...Chhatrapati Sambhajinagar; Thank you to the women representatives | G20 Summit: बाय ॲण्ड थँक्स लॉट...छत्रपती संभाजीनगर; महिला प्रतिनिधींनी मानले आभार

G20 Summit: बाय ॲण्ड थँक्स लॉट...छत्रपती संभाजीनगर; महिला प्रतिनिधींनी मानले आभार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: जी-२० च्या अंतर्गत वूमन-२० या दोन दिवसीय परिषेदसाठी आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधींनी बाय... बाय... ॲण्ड थँक्स लॉट... छत्रपती संभाजीनगर, असे बोलून त्यांनी १ मार्च रोजी शहराचा निरोप घेतला. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या विमानाने १६ महिला प्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाने निरोप देण्यात आला. १ मार्च रोजी उर्वरित प्रतिनिधींनी सकाळपासून वेगवेगळ्या वेळांतील विमानाने प्रस्थान केले.

चैर्ली मिलर, गॅल्याडीस नायर, शाझिया खान, तविशी सिंग, समंथा जान, लिंडा लॉरा शब्दानी, दीपा अहलुवालिया, फ्रान्सिस तोरनेअरी, ॲमू सॅन्याल, हॅरियाना हुताबरत, शमिका रावी, सोलडॅड हेरिरॉवो, गायत्री वासुदेवन या प्रतिनिधींनी २८ रोजी प्रस्थान केले. तर १ मार्च रोजी सुशेन जान फर्ग्युसन, कांता सिंग, जयन मेहता, नीता इनामदार, स्वामीनाथन, वेरीना दी तिमारा, फराह अरब, इस्तानी सुरानो, ऍनी ॲन्जीलिया, क्रिस्तान्ती, नरिनी बोल्हर, इशिता, कार्लो सोल्डाटीनी, स्टिफानो डी टरगीला, कॅर्थिना मिलर, इल्विरा मारास्को, शेविम किया, मधुसेन लक्ष्मी व्ही.टी., जानाभी फोकन, केलसे हॅरिस, सुहाभी, निधी गुप्ता, पूर्वी ठक्कर, ज्यलियन रोझीन, आयेशा अख्तर यांच्यासह इतर महिला प्रतिनिधींनी शहराचा निरोप घेत प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जि.प. सीईओ डॉ.विकास मीना, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान यामध्ये राहिले. विमानतळावर आगमन आणि पाहुण्याचे निरोप सुरळीत व्हावे, यासाठी विमानतळ प्रबंधक डी.जी. साळवे यांची टीम तसेच स्वागत समितीतील सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसीलदार ज्योती पवार, विजय चव्हाण, एसडीएम रामेश्वर रोडगे, विक्रम राजपूत व महसूल प्रशासनाच्या टीमने परिषदेसाठी अलेल्या पाहुण्यांना आज निरोप दिला.

कौतुकास्पद आदरातिथ्य...
जी-२० बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे कौतुकास्पद आदरातिथ्य प्रशासनाने केले होते. महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत आणि निरोप देण्यात आला. संगीतमय वातावरणात, लेझीमच्या तालात पुष्पहार, पैठणी, शेले देऊन केलेल्या स्वागत अप्रतिम असल्याचे गौरवोद्गार पाहुण्यांनी काढले. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणविषयी परिषदा व चर्चासत्राबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, मेजवानीसह शहरातील पर्यटनस्थळ पाहणीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक शासकीय विभागाने नेमून दिलेल्या जबाबदारीने पाहुण्याची काळजी घेतली गेली.

Web Title: G20 Summit: Bye and Thanks Lot...Chhatrapati Sambhajinagar; Thank you to the women representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.