गडदगड मध्यम प्रकल्प ५२ टक्क्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:03 AM2021-08-20T04:03:57+5:302021-08-20T04:03:57+5:30
बुधवारी मध्यरात्रीपासून गौताळा अभयारण्यात झालेल्या जोरदार पावासामुळे लहान मोठे पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे फूल झाले आहेत. तर गडदगड प्रकल्पात ...
बुधवारी मध्यरात्रीपासून गौताळा अभयारण्यात झालेल्या जोरदार पावासामुळे लहान मोठे पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे फूल झाले आहेत. तर गडदगड प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आला आहे. या धरणावरील नागद, वडगाव-जाधव, हरसवाडी, सायगव्हान या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. या भागात जून महिन्यात ६० मि.मी., जुलै महिन्यात ३० मि.मी., ऑगस्ट महिन्यात आजपर्यंत फक्त ३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. असे गडदगड मध्यम प्रकल्पाचे स्थापत्य अभियांत्रिकी डी. पी. सूर्यवंशी यांनी सांगितले.
----
हरसवाडीकरांची तसनतास प्रतीक्षा
गडदगड नदीला पूर आल्याने हरसवाडी गावाकडे जाणाऱ्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. हा रस्ता ये-जा करण्यासाठी बंद होतो. या पुलावरून जाणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी ओसरेपर्यंत तासनतास थांबावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ लागली आहे.
190821\img-20210819-wa0015.jpg
गडदगड धरण प्रकल्प