गायकवाड यांचा यू-टर्न
By Admin | Published: April 29, 2017 11:28 PM2017-04-29T23:28:29+5:302017-04-29T23:33:38+5:30
लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्तारीकरणाला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ खा़डॉ़ सुनिल गायकवाड व रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ लातूरमध्ये जनांदोलन सुरू आहे़
लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्तारीकरणाला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ खा़डॉ़ सुनिल गायकवाड व रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ लातूरमध्ये जनांदोलन सुरू आहे़ या आंदोलना दरम्यान शनिवारी संतप्त कार्यकर्त्यांनी गांधी चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले़ त्यानंतर खाग़ायकवाड यांनी नरमाईची भूमिका घेत यू-टर्न घेतला आहे़ बीदरपर्यंत गेलेली रेल्वे परत आणण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याने प्रयत्न करू, असे खा़सुनिल गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ लातूरची रेल्वे लातूरलाच राहण्यासाठी मी आपल्या पाठिंब्याच्या बळावर प्रयत्न करीत आहे़ ही रेल्वे बीदरला जाण्यासाठी मी कोणतेही पत्र दिले नाही़ काहीजण चुकीचा अपप्रचार करीत आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी पत्रकात केले आहे़
मुंबई-लातूर रेल्वे ही लातूरकरांची ओळख आहे़ गेल्या दहा वर्षांपासून लातूर ते मुंबई या मार्गावर दीड पटीने प्रवासी घेवून धावणारी रेल्वे आता बीदरपर्यंत सोडण्यात आली आहे़ त्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय झाला आहे़ हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे़ या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या भाजपचे खासदार डॉ़सुनिल गायकवाड यांच्यावरही यावेळी कार्यकर्त्यांनी टिका केली़ शिवाय, लातूरकरांची ओळख असलेली रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय रद्द करावा, यासाठी रेल्वे बचाव कृती समितीच्या आंदोलन तीव्र केले जाणार आहे़ शिवाय, हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी कृती समितीकडून विशेष मोहिम राबविली जाणार आहे़ कृती समितीच्या वतीने वार्डा-वार्डात सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे़ शिवाय, खासदारांच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला जाणार आहे़
यावेळी कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करण्यात यावे, बीदर-कुर्ला, हैद्राबाद-पुणे व नांदेड-कुर्ला ही रेल्वे नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, जिल्हाध्यक्ष अॅड़ व्यंकट बेद्रे, महापौर अॅड़ दिपक सूळ, उदय गवारे, शिवाजी नरहरे, पप्पू कुलकर्णी, अभिजित देशमुख, राजेंद्र बनारसे, एस़आऱ देशमुख, समद पटेल, विक्रांत गोजमगुंडे, अशोक गोविंदपूरकर, बसवंतअप्पा भरडे, रविंद्र जगताप, अॅड़ मनोहर गोमारे, सिकंदर पटेल, दिनेश गिल्डा, अल्ताफ शेख, अॅड़ देविदास बोरूळे, प्रदिप गंगणे, व्यंकटेश पूरी, मोहन माने, सुपर्ण जगताप, गोपाळ बुरबुरे, राज क्षिरसागर, प्राचार्य मधुकर मुंडे, शेखर हविले, संजय ओव्हळ, प्रा़ पानगावे, सय्यद रफिक, नगरसेविकास सपनाताई किसवे, अकबर शेख, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, आसीफ बागवान, गौरव काथवटे, कांचन अजनीकर, दगडुअप्पा मिटकरी, दत्ता मस्के, प्रविण घोटाळे, रघुनाथ मदने, बालाजी सिंगापुरे, लक्ष्मीबाई बटनपूरकर, भगवान माकणे, युसूफ शेख, मोहम्मद खान, मुबश्शिर टाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती़