सत्ता प्राप्त करणे हे आंबेडकरी चळवळीचे ध्येय नाही

By Admin | Published: February 23, 2016 12:34 AM2016-02-23T00:34:47+5:302016-02-23T00:40:39+5:30

जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही.

Gaining power is not the aim of the Ambedkar movement | सत्ता प्राप्त करणे हे आंबेडकरी चळवळीचे ध्येय नाही

सत्ता प्राप्त करणे हे आंबेडकरी चळवळीचे ध्येय नाही

googlenewsNext


जालना : आंबेडकरी चळवळीने या देशात परिवर्तनाचा नवा पायंडा निर्माण केला असून, केवळ सत्ता प्राप्त करणे हे चळवळीचे कधीच सूत्र ठेवले नाही. तर या देशात लोकशाही रूजली पाहिजे, टिकली पाहिजे, उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले तरी चालेल. परंतु लोकशाही बळकटीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रा. अविनाश डोळस यांनी येथे केले.
संत शिरोमणी गुरू रविदास व्याख्यानमालेत शेवटच्या पुष्पात ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्ष म्हणून आ. अर्जुन खोतकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. अण्णा सावंत, राजेश राऊत, संतोष साबने, प्रकाश नारायणकर यांची होती.
प्रा. डोळस म्हणाले की, या देशात आंबेडकरी चळवळीचे सूत्र आपण लक्षात घेतले पाहिजे, ज्या चळवळीने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायासाठी सातत्याने संघर्ष केला. हा संघर्ष पाण्यासाठी, कधी माणुसकीसाठी, कधी समतेसाठीचा संघर्ष आहे. तो कधीच एका जाती, जमातींसाठीचा संघर्ष नाही. या चळवळीने कधीच प्रतिक्रियावादी न होता समाजाला प्रतिक्रिया आपल्या कृती आणि उक्तीतून द्यायला भाग पाडले आहे. अगदी अप्रशिक्षीत समाज त्याकाळी आपल्यासोबत येऊन डॉ. बाबासाहेबांनी हा सर्वबदल केला. परंतु आज समाजामध्ये बुद्धीजिवी वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. हा बुद्धीजीवी वर्ग समाजाला योग्य ती दिशा देऊ शकतो. मात्र, तसे घडताना दिसून येत नाहंी. हा बुद्धीजीवी वर्ग स्वत:मध्येच मग्न झाला आहे. बुद्धीजीवी वर्गाने आज सजग होण्याची वेळ आली आहे.
या वेळी समाजातील कार्यकर्त्यांचा चर्मकार युवा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वर्षी हा पुरस्कार गजानन इंगळे, बन्सीलाल ढवळे, जालिंदर वाघमारे, महंमद इरफान, महंमद इस्माईल बागवान, शंकर शिरगुळे या हा पुरस्कार दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा पवार, प्रा. टी. आर. जगताप यांनी केले. आभार गणेश चांदोडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अ‍ॅड. बी. एम. साळवे, सुधाकर निकाळजे, डॉ. विजय कुमठेकर, प्रा. बसवराज कोरे, विजय पंडित, बी. के. शिंदे, बी. आर. भालशंकर, दिपक इंगळे, बबनराव रत्नपारखे, संजय हेरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Gaining power is not the aim of the Ambedkar movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.