सेवली येथे शाळेच्या मैदानावर जुगाराचा खेळ
By Admin | Published: June 19, 2017 11:48 PM2017-06-19T23:48:49+5:302017-06-19T23:51:03+5:30
जालना : सेवली जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांऐवजी जुगाऱ्यांचा खेळ सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सेवली जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांऐवजी जुगाऱ्यांचा खेळ सुरू आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सेवली पोलिसांनी दहा जणांवर कारवाई केली.
सेवली जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी लाईटच्या उजेडात रात्रभर जुगाराचा खेळ सुरू होता. जुगारी त्याच ठिकाणी दारू पिऊन वादही घालत. परिणामी आजूबाजूच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. शिवाय शाळेच्या मैदानावर दारूच्या बाटल्या टाकण्यात येत होत्या.
या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी रविवारी रात्री शाळेच्या मैदानावर जुगार खेळणाऱ्या संशयित बिस्मिला मस्तान शहा, बाबासाहेब रामदास पवार, अमोल बाजीराव गवई, संदीप राजाराम पवार, संतोष तात्याराव ठोकरे, नामदेव रामधन पवार, भाऊराव आसाराम जोशी, जुबेरखाँ वलायत यांना जुगार साहित्यासह ताब्यात घेतले. तर अन्य दोघे पोलिसांनापाहून फरार झाले.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर भारती यांच्या फिर्यादीवरून संशयितांवर सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.