रस्त्यांच्या निधीवरून पत्रांचा खेळ

By Admin | Published: March 20, 2016 11:20 PM2016-03-20T23:20:03+5:302016-03-20T23:24:55+5:30

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या निधीचे प्रकरण अजूनही थंडावले नाही.

The game of letters from the funds of the streets | रस्त्यांच्या निधीवरून पत्रांचा खेळ

रस्त्यांच्या निधीवरून पत्रांचा खेळ

googlenewsNext

हिंगोली : जिल्हा नियोजन समितीमार्फत दिल्या जाणाऱ्या निधीचे प्रकरण अजूनही थंडावले नाही. यात आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा पत्र देत रस्त्यांच्या कामांना मान्यता देण्याची विनंती केली असली तरी त्यात उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जि.प.च्या सर्वसाधारण सभेने जि.प.च्या रस्त्यांवर सा.बां.ने काम करण्यास ना-हरकत मागितल्याचा ठराव फेटाळला आहे. यासाठी सभागृहात एकमत होते. मात्र नंतर त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठपुरावा करून ही ना-हरकत मिळवूनच कामे सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही, हे जणू मान्यच केले. दरवर्षीप्रमाणे कामांना ना-हरकत मिळेल, असे गृहित धरून कामे सुरू केल्याचा पत्रात उल्लेख केला. तर कामे थांबविल्यास निधी मार्चएण्डपर्यंत खर्च न झाल्यास त्याची जबाबदारी घेण्याची तयारी आहे का? अशी विचारणा केली. तसेच यापुढे डीपीसीचा सर्वच प्रकारचा निधी आपणच आपल्या खात्यासाठी मागावा. त्यासाठी डीपीसीत आपले सदस्यही आहेत, असा टोमणाही लगावला आहे. त्यामुळे आता जि.प. सदस्य पुन्हा अधिकचेच आक्रमक दिसून येत आहेत. येणाऱ्या सभेत अनुपालनात हा विषय निघेल तेव्हा या पत्राची आठवण करून देण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The game of letters from the funds of the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.