गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर

By विकास राऊत | Published: September 8, 2022 07:39 PM2022-09-08T19:39:09+5:302022-09-08T19:40:17+5:30

मराठवाड्यातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यां ही मदत सोमवारपासून बँक खात्यावर जाणार आहे.

Ganapati gives good news to the farmers, compensation of 3501 crores in the state and 1000 crores to Marathwada | गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर

गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर

googlenewsNext

औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्याला खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसला. यात जुलैमध्ये ५ लाख ८७ हजार ४६६.४१ तर ऑगस्टमध्ये १ लाख ४० हजार ३३१.४४ असे ७ लाख ३६ हजार १३३.३८ हेक्टर जिरायती व फळबाग क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईसाठी शासनाने गुरुवारी सायंकाळी १ हजार ८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. 

विभागातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यां ही मदत सोमवारपासून बँक खात्यावर जाणार आहे. राज्यातील सुमारे २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे बाधित क्षेत्र २३ लाख ८१ हजार इतके आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केल्याने व सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीलाही मोबदला मिळेल, अशी घोषणा केल्याने मराठवाड्याला अनुदान वाटपासाठी १ हजार ५९६ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी लागणार आहे, असा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाच्या वतीने राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. त्यातुलनेत केवळ अतिवृष्टीची नुकसान भरपाई ची १ हजार ८ कोटीची मदत जाहीर केली आहे. 

एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने मोबदला जाहीर केला आहे. शिवाय २ ऐवजी ३ हेक्टरचा समावेश केला. तसेच सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाही मोबदल्याची घोषणा केली. ही मदत गुरुवारी काढलेल्या अध्यदेशात नाही. तसेच गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मोबदल्यापोटी काहीही मदत यात नाही.

दोन दिवसात मदत वाटप सुरू होईल
दोन दिवसात शेतकऱ्यांना मदत वाटप होईल. तीन टप्प्यात मदत मिळेल, यात महा अतिवृष्टी, अतिवृष्टी आणि गोगलगाय व्हायरलमुळे जे नुकसान झाले, त्याची मदत केली जाईल. शासनाने जे निकष लावून नुकसान भरपाई दिली, विमा कंपन्यानी तातडीने त्याच आधारे भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 
- अब्दुल सत्तार, कृषीमंत्री 

मराठवाड्यात किती मदत
जालना--३ कोटी ७१ लाख ८४ हजार-- बाधित क्षेत्र-२३११.७९ हेक्टर
परभणी--१कोटी ६० लाख ३४ हजार--बाधित क्षेत्र ११७९ हेक्टर 
हिंगोली--१५७कोटी४ लाख ५२ हजार--बाधित क्षेत्र १ लाख १३ हजार ६२० हेक्टर 
नांदेड--७१७ कोटी ८८ लाख ९२ हजार--बाधित क्षेत्र ५ लाख २७ हजार ४९१ हेक्टर 
लातूर--३७ कोटी ३० लाख ८३ हजार--बाधित क्षेत्र-२७ हजार ४२५.३७ हेक्टर
उस्मानाबाद--९०कोटी ७४ लाख ३६ हजार--बाधित क्षेत्र--६६ हजार ७२३.२० हेक्टर 
एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र; ७३८७५०.३६ हेक्टर 
एकूण मदत; १ हजार ८ कोटी ७१ लाख २४ हजार (वाहून गेलेल्या जमिनीसह)

Web Title: Ganapati gives good news to the farmers, compensation of 3501 crores in the state and 1000 crores to Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.