Gandhi Jayanti : विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गांधी विचारांचे भांडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:00 PM2018-10-02T16:00:51+5:302018-10-02T16:02:54+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य ग्रंथालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आॅडिओ, ई-बुक्स गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुख्य ग्रंथालयाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आॅडिओ, ई-बुक्स गांधी जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत.
विद्यापीठातील ग्रंथालयाचा आॅनलाईन प्रगतीमध्ये देशात पहिल्या पाच ग्रंथालयांमध्ये समावेश होतो. या ग्रंथालयातील सर्व ग्रंथांचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. याचवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि साहित्य आॅनलाईन उपलब्ध करण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली असल्याचे गं्रथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन लिटरेचर आॅन महात्मा गांधी या सदराखाली विविध लिंक तयार केल्या आहेत. यात गांधी साहित्यावरील ई-ग्रंथ, ई-थिसिस, ई-आॅडिओ बुक, स्पीच, चित्रपट विद्यार्थ्यांसह गांधीप्रेमींना वाचता येणार आहेत. हे सर्व कार्य माहिती शास्त्रज्ञ गजानन खिस्ते यांनी केले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रंथपाल तथा संचालक डॉ. धर्मराज वीर यांनी केले आहे.