विद्यार्थ्यांनी तयार केल्या शाडूपासून गणेश मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:35 PM2019-08-30T23:35:05+5:302019-08-30T23:35:12+5:30

विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.

Ganesh idol from Shadu created by students | विद्यार्थ्यांनी तयार केल्या शाडूपासून गणेश मूर्ती

विद्यार्थ्यांनी तयार केल्या शाडूपासून गणेश मूर्ती

googlenewsNext

चितेगाव : पैठणखेडा येथील श्रीकृष्ण प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या लहान मोठ्या गणेश मूर्ती तयार केल्या.

शाडूच्या मातीपासून बनविण्यात आलेले गणपती हे पर्यावरणपूरक असून निसगार्ची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. महागडी केमिकलचे रंग हे पाणी दुषित करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. या प्रसंगी कला शिक्षक चंद्रकांत रंगराव पवार यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अमोल बढे, प्रदीप तांबारे, नानासाहेब थोरात,राजेंद्र जयकारे,नंदू बोरसे,नितीन नेरकर,भगवान पवार,पंकज पवार,राजेंद्र सोनवणे,मनोहर राठोड,संतोष जिरेमाळी, सुनील देवरे यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Ganesh idol from Shadu created by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.