Ganesh Visarjan: वॉच टॉवरवरून लक्ष ते स्पेशल स्कॉड; अडिज हजार पोलिसांचा औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त

By राम शिनगारे | Published: September 9, 2022 07:46 PM2022-09-09T19:46:29+5:302022-09-09T19:48:07+5:30

पोलिसांचे पथक विसर्जन स्थळी घेत आहे विशेष काळजी

Ganesh Visarjan: Attention from Watch Tower to Special Scod; Strict security of 2 thousand 500 Police in Aurangabad | Ganesh Visarjan: वॉच टॉवरवरून लक्ष ते स्पेशल स्कॉड; अडिज हजार पोलिसांचा औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त

Ganesh Visarjan: वॉच टॉवरवरून लक्ष ते स्पेशल स्कॉड; अडिज हजार पोलिसांचा औरंगाबादेत कडेकोट बंदोबस्त

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या महाकाय संकटानंतर ११ दिवस जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तवर गणेश मूर्तिंचे विसर्जन करण्यात येते आहे. अतिशय जल्लोषात मिरवणूक निघाल्या असुन पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मिरवणुक मार्गासह गणेश मूर्तिंचे विसर्जन केल्या जाणाऱ्या विहिरी, परिसरातील तलावावर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन करण्यासाठी युवक आतमध्ये उतरण्याची शक्यता गृहीत धरून हा बंदोबस्त लावला आहे.

शहर पोलिसातील वरिष्ठ अधिकऱ्यांसह १७६ अधिकारी आणि २ हजार ५४६ कर्मचारी असा तगडा बंदोबस्त विविध ठिकाणी तैनात केला आहे. यात सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुख्य विसर्जन मिरवणुक, विसर्जन विहीर, मिरवणूक मार्ग, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी पोलिसांचे पथक तैनात केल्याचे दिसून आले. आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता,  उपायुक्त उज्ज्वला वनकर, दीपक गिरहे, अपर्णा गीते यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त बंदोबस्तावर  देखरेख ठेवत आहेत.

या भागात निघाल्या मिरवणुका
११ दिवसाच्या उत्सवानंतर लाडक्या गणपती बाप्पा निरोप देण्यात येत आहेत. त्यासाठी सर्वत्र जंगी मिरवणुका निघल्या आहेत.  जुने शहरातील मुख्य मिरवाणुकीसह सिडको हडको, मुकुंदवाडी, शिवाजीनगर, गारखेडा, जवाहर नगर, पुंडलिकनगर, सातारा परिसर, नक्षत्रवाडी, वाळूज, वाळूज महानगर, दौलताबाद, छावणी, हर्सूल आदी भागात मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. या सर्व ठिकाणी तगड़ा बंदोबस्त असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश अघाव यांनी दिली. 

धक्का स्कॉड  तत्पर
विशेष शाखा १ अधिकारी, १५ कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे १ अधिकारी, २० कर्मचारी असे सात पथके मिरवणूक पुढे नेण्यासाठी साध्या वेशात मिरवणुकीत तैनात केले आहेत. त्यामुळे मिरवणुक कोठेही थांबत नसल्याचे दिसून आले.

शहराच्या इंट्री पॉइंटवर तपासणी
शहराच्या हद्दीवर सहा ठिकाणी चेक पोस्टवर तपासणी करण्यात येत आहे. यात हर्सूल नाका, जालना नाका, बीड नाका, पैठण रोड नाका, दौलताबाद टी पॉईंट आणि वाळूज नाका येथे वाहतूक शाखेचे ३६ कर्मचारी ळ वाहनांची तपासणी करीत आहेत.

वॉच टॉवरवरुन देखरेख
गर्दीच्या पाच ठिकाणी मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहागंज, सिटी चौक, बारभाई ताजिया, जिजामाता चौक एन-९, टीव्ही सेंटर येथे वॉच टॉवरच्या माध्यमातून निगरानी करण्यात येत आहे.

Web Title: Ganesh Visarjan: Attention from Watch Tower to Special Scod; Strict security of 2 thousand 500 Police in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.