बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी; छत्रपती संभाजीनगरातील 'हे' १९ मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद

By सुमित डोळे | Published: September 16, 2024 07:26 PM2024-09-16T19:26:47+5:302024-09-16T19:28:18+5:30

छत्रपती संभाजीनगरातील मुख्य शहर, सिडको-हडकोच्या मुख्य मिरवणुकीचे १९ मार्ग संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार

Ganesh Visarjan in Chhatrapati Sambhaji Nagar: 'This' 19 road closed for traffic all day | बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी; छत्रपती संभाजीनगरातील 'हे' १९ मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद

बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी; छत्रपती संभाजीनगरातील 'हे' १९ मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद

छत्रपती संभाजीनगर : गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या उत्साहात भक्तांच्या सहवासात राहिलेल्या सर्वांचा लाडका बाप्पा आज निरोप घेत आहे. त्याच्या निरोपासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुख्य मिरवणुकी दरम्यानचे १४ तर सिडको हडको व गजानन महाराज मंदिर मार्गावरील ५ मार्ग सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत.

शहरात यंदा गणेश मंडळांची एक हजार पेक्षा अधिक विक्रमी नाेंद झाली. पहिल्यांदाच सर्वाधिक २१ फुटांच्या गणरायाच्या मुर्तीची स्थापना झाली असून ४ मोठ्या मंडळांची नोंदणी झाली. विसर्जनाच्या १४ ठिकाणांवर या सर्व मंडळांची आज उत्साहात मिरवणुक निघणार असून बहुतांश मंडळांकडून ढोल ताशा पथकाचे सादरीकरण केले जाणार आहे. या दरम्यान पोलिसांकडून सकाळी ७ वाजेपासूनच विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद केले जाणार आहेत. नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शहरातील हे मार्ग राहणार बंद
-संस्थान गणपती ते गांधीपुतळा, सिटोचीक, गुलमंडी, बाराभाई ताजिया, बळवंत
वाचनालय, एस.बी. कॉलेज मार्गे जिल्हा परिषद मैदान.
-संस्थान गणपती ते शहागंज चमन, गांधीपुतळा, सिटीचौक, जुनाबाजार मार्गे भडकलगेट.
-जिन्सी चौक ते संस्थान गणपती, जाफरगेट-मोंढा ते राजाबाजार.
-निजामोद्दीन दर्गा रोड ते निजामोद्दीन चौक व डावीकडे शहागंज चमन.
-भुरे पहेलवान यांचे घर ते निजामोद्दीन चौक व उजवीकडे शहागंज चमन
-चेलीपुरा चौक ते गांधी पुतळा, मंजुरपुरा चौक ते गांधीपुतळा.
-लोटाकोरंजा ते सराफा रोड, रोहिला गल्ली ते सराफा रोड.
-कामाक्षी लॉज ते सिटीचौक व पुढे गुलमंडी, बाराभाई ताजिया, गोमटेश मार्केट मार्गे पैठणगेट या रस्त्यावरील सर्व पूर्व-पश्चिम दिशेच्या गल्ल्या बंद राहतील.
-सिटीचौक पोलीस ठाण्याच्या पश्चिमेकडील बुऱ्हाणी शाळेकडे जाणारा मार्ग.
-बुढ्ढीलाईन, जूने तहसिल कार्यालय, जुना बाजार, बारुदगरनाला.
-सिल्लेखाना चौक, पैठणगेट, बाराभाई ताजिया, रंगारगल्ली, सिटीचौक.
-सावरकर चौक, एम.पी. लॉ महाविद्यालय, महात्मा फुले पुतळा बळवंत वाचनालय चौक.
-अंजली सिनेमागृह, महात्मा फुले चौक ते बाबुराव काळे चौक.
-रॉक्सी कॉर्नर, जिजामाता कॉलनी ते बाबूराव काळे चौक.

सिडको, हडको, गजानन महाराज मंदिर मार्गही बंद
-चिश्तीया चौक, अविष्कार चौक, बजरंग चौक, बळीराम पाटील शाळा चौक, ओंकार चौक ते सिडको पोलीस ठाण्यासमोर, एन-७ बसस्थानक, टी. व्ही. सेंटर चौक ते एन-१२ स्वर्ग हॉटेल जवळील विहिरीपर्यंत. त्याशिवाय जिजाऊ चौक ते शरद टी.
-चांदणे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, टी.व्ही. सेंटरकडे जाणारा रस्ता.
-एन १ चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल जकात नाका तसेच चिश्तिया चौक ते द्वारकादास शामकुमार साडी सेंटर.
-आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बँके पर्यंत.
-सेव्हनहील ते शिवाजीनगर, त्रिमुर्ती चौक ते गजानन महाराज मंदिर.

Web Title: Ganesh Visarjan in Chhatrapati Sambhaji Nagar: 'This' 19 road closed for traffic all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.