संस्थान गणपतीच्या आरतीने गणेशोत्सवास सुरुवात; मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी धरला ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 12:59 PM2022-08-31T12:59:55+5:302022-08-31T13:01:16+5:30

गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची औरंगाबादची परंपरा कायम

Ganeshotsav begins with Sansthan Ganpati's aarti; In the procession, the leaders of all parties chandakant khaire, atul save, amabadas danave daces together | संस्थान गणपतीच्या आरतीने गणेशोत्सवास सुरुवात; मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी धरला ठेका

संस्थान गणपतीच्या आरतीने गणेशोत्सवास सुरुवात; मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी धरला ठेका

googlenewsNext

औरंगाबाद: शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात आज सकाळी १०.३० वाजता प्रतिकृतीची स्थापना व आरतीने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी मिरवणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र ठेका धरला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची औरंगाबादची परंपरा यावर्षी देखील पाहायला मिळाली. 

गणपती बाप्पाचे आज घरोघरी आगमन होत आहे. तर दोन वर्षानंतर गणेशोत्सव भव्य स्वरुपात होत आहे. यामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. यातच शहरातील शिवसेना, भाजपचे नेते यावेळी संस्थान गणपतीच्या आरतीसाठी एकत्र आले. एवढेच नाही तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री अतुल सावे अन् विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राजकीय विसंवाद बाजूला ठेवत संगीताच्या तालावर सोबत ठेका धरला. 

राजकीय मतभेद विसरून एकत्र
आजच्या दिवशी राजकीय वाद बाजूला ठेवत आम्ही एकत्र येतो अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खैरे यांनी दिली. तर मंत्री सावे यांनी निर्बंध मुक्त गणेशोत्सव होत असल्याने त्याचा आनंद घेत आहोत असे म्हटले. तसेच विरोधी पक्ष नेते दानवे यांनी गणेशोत्सव सर्व विसरून साजरा करायचा असतो अशी प्रतिक्रिया दिली.

नॅनो मूर्तीलाही पसंती
घरोघरी अर्ध ते दोन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीची स्थापना करणाऱ्यांची संख्या कमी नाही पण घरात ६ इंचांपर्यंतची मूर्ती बसवावी, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. अशा नॅनो मूर्ती खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे मूर्तिकार आवर्जून या ६ ते ९ इंचांच्या मूर्ती तयार करत असतात. त्यात दगडूशेठ हलवाई, कसबा गणपतीला जास्त पसंत केले जाते.

‘श्रींची मूर्ती स्थापन कधी करावी ?
सार्वजनिक गणेश मंडळातर्फे सायंकाळी स्थापना करण्यात येते. पण शक्यतो घरची मूर्ती दुपारी दीड वाजण्याच्या आत स्थापन करावी, अशी माहिती सुरेश केदारे गुरुजी यांनी दिली.
 

Web Title: Ganeshotsav begins with Sansthan Ganpati's aarti; In the procession, the leaders of all parties chandakant khaire, atul save, amabadas danave daces together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.