दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:05 AM2021-09-03T04:05:03+5:302021-09-03T04:05:03+5:30

खुलताबादेतून चोरी केलेल्या मोटारसायकली जप्त खुलताबाद : परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या पाचजणांच्या टोळीस चाळीसगाव पोलिसांनी पकडून खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात ...

The gang that stole the bike is gone | दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड

googlenewsNext

खुलताबादेतून चोरी केलेल्या मोटारसायकली जप्त

खुलताबाद : परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या पाचजणांच्या टोळीस चाळीसगाव पोलिसांनी पकडून खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खुलताबाद शहर व परिसरातून गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवूनही दुचाकी चोर हाती लागत नव्हते. यादरम्यान ३० ऑगस्टला चाळीसगाव शहर पोलीस आपल्या हद्दीत गस्त घालत असताना चार संशयित दोन विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना मिळून आले. त्यांना विचारपूस केली असता खुलताबाद व भद्रा मारुती मंदिर परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे पुढे आले. संबंधित दुचाकी या विक्रीसाठी चाळीसगावला आणल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

खुलताबादच्या पोलीस पथकाने चाळीसगावला जाऊन आरोपीस ताब्यात घेत त्यांना अटक केली. यात रोहित मच्छिंद्र गणराज, सौरभ साहेबराव इंदापुरे, अजय भानुदास गणराज (तिघे रा. रांजणगाव खुरी, ता. पैठण), शुभम दामांदर नेव्हाल (रा. शिवराई वाळुज, ता. गंगापूर), महेंद्र शंकर जाधव (रा. गणेश नगर चाळीसगाव, जि. जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे, फौजदार जनार्दन मुरमे, बीट अंमलदार रतन वारे, शेख जाकीर, यतीन कुलकर्णी, सिद्धार्थ सदावर्ते, किशोर महेर, प्रमोद गरड, बालाजी डाके तपास करीत आहेत.

-- फोटो : जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या दुचाकीसह खाली बसलेले आरोपी. साेबत खुलताबाद पोलीस.

020921\1717-img-20210902-wa0045.jpg

खुलताबाद येथून पाच मोटारसायकल चोरी करणारी टोळी पोलीसांनी गजाआड केली आहे. सोबत खुलताबाद पोलीस अधिकारी व कर्मचारी

Web Title: The gang that stole the bike is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.