जालना जिल्ह्यातील दुचाकी चोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:02 AM2021-08-17T04:02:16+5:302021-08-17T04:02:16+5:30
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील दुचाकी चोरांचा टोळी चिकलठाणा पोलिसांच्या पथकाने जेरबंद केली आहे. या चोरट्यांकडून तब्बल चोरीच्या ...
औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील दुचाकी चोरांचा टोळी चिकलठाणा पोलिसांच्या पथकाने जेरबंद केली आहे. या चोरट्यांकडून तब्बल चोरीच्या दहा दुचाकीसह ४ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.
चिकलठाणा पोलीस हद्दीत हवालदार लहू थोटे, गणेश मुळे, अंमलदार दीपक सुरोशे, अण्णा गावंडे हे गस्तीवर असताना निपाणी फाटा, बीड रोड येथील एकाने दुचाकीचाेरीला गेल्याची माहिती दिली. यावरून अंमलदाराने चित्तेगावकडे पाठलाग करून चोरीला गेलेली दुचाकी आणि चोराला पकडण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, त्याने आणखी चार साथीदार असल्याची माहिती दिली. यावरून उपनिरीक्षक प्रदीप ठुबे यांच्यासह पोलिसांचे पथक जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे धाड टाकली. त्यात दोन आरोपी आणि नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये शहाजी सुधाकर कुरकुटे, तात्यासाहेब अशोक भालेकर, शाहरुख मुक्तार शेख (सर्व रा. तीर्थपुरी, ता. घनसावंगी,
जि.जालना) यांचा समावेश आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, हवालदार लहू थोटे, गणेश मुळे, दीपक देशमुख, अंमलदार दीपक सुरोशे, अण्णा गावंडे, योगेश तरमाळे यांच्या पथकाने केली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी पथकाच्या कारवाईबद्दल अभिनंदन केले आहे.
चौकट,
या दहा दुचाकी जप्त
चिकलठाणा पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये चिकठाणा हद्दीतील ३, बीडकीन १, अंबड १ आणि करमाड येथील १ दुचाकी आहे. उर्वरितचा शोध सुरू आहे. जप्त केलेल्यांमध्ये एम.एच.२० ईडब्ल्यू ५३६०, एम.एच. २० डी.आर.३१४८, एम.एच.२१ ए वाय ५५४६, एम.एच. १६ बीडब्ल्यू ३१९३, एम.एच.२० सी डब्ल्यू ९५५२, एम.एच. २१ बीजे ६२५४, एम.एच.२१ एई ५२०९, एम.एच. २० एफएम ६३३२, एम.एच.२० डीएच ११११ आणि एम.एच.२०, एफडी १६७८ या दुचाकी आहेत.