'गणपती बाप्पा मोरया...' लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन
By संतोष हिरेमठ | Updated: September 19, 2023 18:34 IST2023-09-19T18:33:22+5:302023-09-19T18:34:17+5:30
संपूर्ण कुटूंबासह अनेक जण गणेश मूर्ती खरेदीसाठी येत असल्याचे पहायला मिळत आहे.

'गणपती बाप्पा मोरया...' लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन
छत्रपती संभाजीनगर : शहरात लाडक्या गणरायाचे मोठ्या भक्तिवात आणि जल्लोषात आगमन होत आहे. शहरातील प्रत्येक चौकात गणेश मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 'गणपती बाप्पा मोरया...' असा जयघोष होत आहे.
शहरातील टीव्ही सेंटर चौक परिसरात गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. संपूर्ण कुटूंबासह अनेक जण गणेश मूर्ती खरेदीसाठी येत असल्याचे पहायला मिळत आहे.
गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह संचारला आहे. भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. १६ फुटाच्या हडकोच्या राजाच्या श्रींची टीव्ही सेंटर चौक परिसरातून वाजत-गाजत, भव्य मिरवणूक काढण्यात आली.