कचऱ्यामुळे पर्यटकही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:03 AM2018-07-18T01:03:15+5:302018-07-18T01:03:40+5:30
जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर औरंगाबादचे नाव अग्रभागी आहे, तशी आता या शहराची ओळख कच-याच्या राजधानीचे शहर म्हणूनही झालेली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून शहरभर साचलेले कच-याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे शहरात येणा-या पर्यटकांवर परिणाम झालेला असून साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात देश- विदेशातील पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख १२ हजार २०६ देशभरातील पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली, तर या वर्षात जानेवारी ते जूनदरम्यान १७ लाख ९ हजार ८७१ पर्यटकांनी भेट दिली आहे. यामध्ये जानेवारी ते जून २०१८ दरम्यान औरंगाबादेत येणाºया विदेशी पर्यटकांची संख्या ३७ हजार २८ एवढी आहे.
यासंदर्भात टुुरिझम प्रमोटर्स गिल्डचे जसवंत सिंग म्हणाले की, औरंगाबादेत पर्यटक कशाला येतील आणि आम्ही तरी त्यांना तिकडे का पाठवावे, असा प्रश्न दिल्ली येथील इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संंस्थेने शहरातील टूर आॅपरेटर्स आणि एजंट यांना केला आहे. मागील महिन्यात इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्स या संस्थेचे अध्यक्ष प्रणव सरकार हे शहरात येऊन गेले. तेव्हा ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग पाहून त्यांनी अत्यंत दु:ख व्यक्त केले आणि आता कचरा पाहण्यासाठी पर्यटकांना या शहरात पाठवावे का? असा सवाल के ला.
शहरातील कचरा पर्यटकांनी पाहू नये म्हणून टूर एजंट लोकांना अनेक दिव्यातून जावे लागत आहे. विदेशी पर्यटकांना किंवा परराज्यांतून शहरात येणाºया पर्यटकांना शहरात फिरावयाचे असेल तर अक्षरश: कचरा लपवत फिरावे लागत आहे. भलेही लांबच्या रस्त्यावरून नेले तरी चालेल, पण जेथे कचरा आहे अशा रस्त्यांवरून पर्यटकांना नेणे टाळा, अशा सक्त सूचना टूर एजंटांनी चालकांना देऊन ठेवल्या आहेत. बीबीका मकबरा, पाणचक्की यासारख्या ठिकाणी पर्यटकांना नेण्यास खूप त्रास होतो. कचरा कि तीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे तो पर्यटकांच्या नजरेस पडतोच. यामुळे पर्यटक आपल्या शहराची वाईट प्रतिमा घेऊन मायदेशी जात आहेत. याचा परिणाम पुढच्या काळात नक्कीच पाहायला मिळेल. शहराची अशीच अपकीर्ती होत राहिली तर आगामी काळात शहरातील पर्यटनाला कचºयाचा फार मोठा फटका बसेल, अशी चिंता पर्यटन क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली.