कचराकोंडी हे शिवसेनेचे अपयश; भाजपचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:32 AM2018-07-18T01:32:30+5:302018-07-18T01:32:47+5:30

शिवसेना खा. चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील सत्तेचे चालक (महापौर) यांना पाच महिन्यांत कचराकोंडी फोडण्यात अपयश आल्याचा आरोप भाजपने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेच्या अपयशामुळे भाजपची फरपट होत आहे. त्यामुळे कचरा प्रकरणात सेनेवर कुरघोडी करण्यासाठी नागपुरात १८ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत भाजप ठोस निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Garbage disposal: Shivsena's failure; BJP blames | कचराकोंडी हे शिवसेनेचे अपयश; भाजपचा ठपका

कचराकोंडी हे शिवसेनेचे अपयश; भाजपचा ठपका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शिवसेना खा. चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील सत्तेचे चालक (महापौर) यांना पाच महिन्यांत कचराकोंडी फोडण्यात अपयश आल्याचा आरोप भाजपने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेच्या अपयशामुळे भाजपची फरपट होत आहे. त्यामुळे कचरा प्रकरणात सेनेवर कुरघोडी करण्यासाठी नागपुरात १८ जुलै रोजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत भाजप ठोस निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले, कचरा प्रकरणात खा. खैरे राजकारण करीत असून, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा मिळत नसल्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्ष आडकाठी आणत असल्याचे आरोप केले. रविवारी खा. खैरेंनी विधानसभा अध्यक्षांमुळे कचरा प्रक्रियेला जागा मिळत नसल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने मंगळवारी खैरेंवर आरोपांच्या फैरी झाडल्या. दुस-यावर आरोप करण्यापेक्षा खैरेंनी सर्वपक्षीय बैठक घेऊन काहीही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला नाही. मनपा प्रशासनाने कांचनवाडी, मिटमिटा येथे प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असता खैरेंनी राजकीय वादळ उठविल्याची तोफ त्यांनी डागली. शासनाने ९१ कोटी दिले असताना निविदा प्रक्रियेला गती मिळत नाही. मनपाच्या लहान-लहान गोष्टींमध्ये खैरे लुडबूड करतात. कच-यामुळे शहर रोगराईच्या उंबरठ्यावर उभे आहे, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून त्यांनी एकत्रितपणे कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. खैरे सध्या युतीचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरच सर्व जबाबदारी आहे. त्यांनी शहराला वेठीस धरू नये. त्यांना जनता माफ करणार नाही, असे प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले. भाजपच्या वॉर्डांत कचरा प्रक्रिया केली जात असल्याचे उदाहरणे त्यांनी उपमहापौर विजय औताडे यांच्या साक्षीने दिले. तसेच दिल्लीच्या संस्थेला कोट्यवधी रुपयांतून शहरात ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती करण्याचे कंत्राट देण्याच्या ठरावाला भाजपचा विरोध असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या सत्तेत शिवसेना ड्रायव्हर
पालिकेच्या सत्तेत शिवेसना ड्रायव्हर (महापौर) आहे. भाजपची सेनेमुळे फरपट होत असून, त्यांच्या अपयशाचे खापर भाजपवर सत्तेचे भागीदार म्हणून फुटत आहे. सत्तेत सोबत असल्यामुळे आमचा नाईलाज झाला आहे, असे बोराळकर म्हणाले.
सेना-भाजप युतीत लोकसभा निवडणुका झाल्यास शिवसेनेने उमेदवार बदलावा, अशी भाजपची मागणी राहील काय, खैरेंना औरंगाबादकरांनी मतदान करू नये, असेही पक्षाचे धोरण राहणार आहे काय? यावर डॉ. कराड आणि बोराळकर यांनी काहीही उत्तर दिले नाही.
१५ दिवसांत कचराकोंडी फुटली नाही तर मनपाच्या सत्तेतून बाहेर पडणार काय, यावर ते म्हणाले, बाहेर पडून काय करणार, शहराचे प्रश्न सुटणार नाहीत. भाजप पालिकेत अल्पसंख्याक असल्यामुळे हतबल आहे.
प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी कचरा प्रकरणात काय केले, या पत्रकारांच्या प्रश्नावर उभयंतांनी काय केले याचा पाढा वाचला. कचरा नियोजनाचे श्रेय भाजपला मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनी दुर्लक्ष केले आहे काय? यावर कराड म्हणाले, तसे असते तर शासनाने मनपाला अनुदानच दिले नसते.

Web Title: Garbage disposal: Shivsena's failure; BJP blames

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.