कचरा दिसेल तेथे पेटवा, खड्डा असेल तेथे गाडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:25 AM2018-05-11T00:25:19+5:302018-05-11T00:26:26+5:30
कचऱ्याचे ढीग जेथे दिसतील तेथे पेटवून द्या, जेथे खड्डा असेल तेथे गाडून टाका,असे बेकायदेशीर तंत्र शहरातील चोहोबाजूंनी सुरू झाले आहे. विल्हेवाटीची ही प्रक्रिया शहराचे आरोग्य धोक्यात आणणारी असून, रोजाबाग परिसरातील खुल्या जागेत कचरा पुरण्यास नागरिकांनी विरोध करताच तेथील नगरसेवकाने दांडगाईने त्या परिसरात कच-याचे ट्रक रिकामे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कचऱ्याचे ढीग जेथे दिसतील तेथे पेटवून द्या, जेथे खड्डा असेल तेथे गाडून टाका,असे बेकायदेशीर तंत्र शहरातील चोहोबाजूंनी सुरू झाले आहे. विल्हेवाटीची ही प्रक्रिया शहराचे आरोग्य धोक्यात आणणारी असून, रोजाबाग परिसरातील खुल्या जागेत कचरा पुरण्यास नागरिकांनी विरोध करताच तेथील नगरसेवकाने दांडगाईने त्या परिसरात कच-याचे ट्रक रिकामे केले. ट्रक रिकामे केल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने पूर्ण कचरा तेथे पुरण्यात येत होता. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. शहरात सर्वत्र कचºयाची विल्हेवाट अशाच पद्धतीने लावली जात असल्याचे दिसते.
१६ मे नंतर शहरात रस्त्यावर कचरा पडलेला आढळल्यास आणि १०० टक्के कचरा वर्गीकरण झाला नाही, तर संबंधित वॉर्ड अधिकारी आणि नियंत्रण अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या अखत्यारीत समितीने घेतला आहे. गुरुवारी यासंबंधीचा कार्यालयीन आदेश पालिका प्रशासनाने जारी केला. कचरा समस्या नियंत्रणात आणण्यासाठी ठरलेल्या नियोजनानुसार पालिका प्रशासनाने प्रभागनिहाय वॉर्ड अधिकारी, नियंत्रण अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. शासन आदेशाप्रमाणे कचरा विल्हेवाटीसाठी सात जागांची निश्चिती करण्यात आली आहे.
यापैकी चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी या चार ठिकाणी पालिका मालकीच्या जागांवर शहरातील ओला कचरा हलविण्याचे नियोजन केले आहे. तथापि, ११ मे पासून या चार ठिकाणी शहरात रस्त्यांवर पडलेला मिक्स कचरा संकलित करून हलविला जाणार आहे. तेथे या कचºयाचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. १५ तारखेपर्यंत याप्रमाणे कार्यवाही केली जाणार असून १६ मेनंतर रस्त्यांवर कचरा दिसल्यास संबंधित वॉर्ड अधिकारी व नियंत्रण अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय आता विभागीय समितीने घेतला आहे.
वॉर्ड अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस
भालचंद्र पैठणे, संपत जरारे या वॉर्ड अधिकाºयांना अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच विजय मिसाळ, असदउल्ला खान या स्वच्छता निरीक्षकांनाही नोटीस बजावली आहे.
कचरा विल्हेवाटीत हलगर्जी केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.