गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६५ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:05 AM2021-08-20T04:05:02+5:302021-08-20T04:05:02+5:30

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती महागाईत तेल ओतण्याचे काम करत आहेत. पुन्हा एकदा गॅस सिलिंडर २५ ...

Gas cylinders go up by Rs 25 again; Now count Rs 865 | गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६५ रुपये

गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढले; आता मोजा ८६५ रुपये

googlenewsNext

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती महागाईत तेल ओतण्याचे काम करत आहेत. पुन्हा एकदा गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागले. आता एका सिलिंडरसाठी ८६८ रुपये मोजावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांचा अपवाद वगळता अन्य महिन्यांत गॅस सिलिंडरची भाववाढ झाली आहे. जानेवारीत ७०३ रुपयांनी मिळणारा सिलिंडर आज चक्क ८६८ रुपयांना खरेदी करावे लागत आहे. म्हणजे मागील ८ महिन्यांत १६५ रुपयांनी सिलिंडरचे भाव वाढले आहे. प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला गॅस सिलिंडर लागतेच. सिलिंडरच्या किमती महागल्या तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होतो. यामुळे गृहिणी वर्गात भाववाढीविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

चौकट

८ महिन्यांत १६५ रुपयांची वाढ

महिना (दर रुपयांत)

जानेवारी ७०३

फेबुवारी ७७८

मार्च ८२८

एप्रिल ८१८

मे ८१८

जून ८१८

जुलै ८४३

ऑगस्ट ८६८

---

चौकट

तुटपुंजी सबसिडी बंद दरवाढ सुरूच

एप्रिल २०२०मध्ये गॅस सिलिंडरचे दर ७५० रुपये होते, तेव्हा १६५.७६ रुपये सबसिडी बँक खात्यात जमा होत होती.

सप्टेंबरपासून ३.२६ रुपये सबसिडी जमा होत आहे. मात्र, अनेक ग्राहकांची तक्रार आहे की, तुटपुंजी सबसिडीही बँक खात्यात जमा होत नाही.

चौकट

छोट्या सिलिंडरचे दर ‘जैसे थे’

पाच किलोच्या छोटा सिलिंडर ५०७.५० रुपयांना मिळत आहे.

या सिलिंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही.

चौकट

व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयांनी महागला

व्यावसायिक सिलिंडरचे दर पाच रुपयांनी महागले आहेत.

सध्या व्यावसायिक सिलिंडर १६८१ रुपयांना मिळत आहे.

चौकट

शहरात चुली कशी पेटवायच्या

सिलिंडरचे दर गगणाला भिडले आहे. यामुळे घरगुती बजेट बिघडले आहे. पगार वाढला नाही, पण महागाई दरमहिन्याला वाढत असल्याने उत्पन्न व खर्चात ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे.

सुलोचना सूर्यवंशी

गृहिणी

--

गरिबांना आता सिलिंडर विकत घेणे परवडत नाही, ग्रामीण भागात असतो तर लाकडे तोडून चूल पेटविली असती. पण शहरात चूलही पेटविता येत नाही.

वरलक्ष्मी गायकवाड

गृहिणी

Web Title: Gas cylinders go up by Rs 25 again; Now count Rs 865

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.