गॅस गळती होऊन घाटनांद्र्यात सिलिंडर पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:03 AM2021-07-23T04:03:57+5:302021-07-23T04:03:57+5:30
घाटनांद्रा : येथे गुरुवारी दुपारी चहा ठेवण्यासाठी वृद्ध महिलेने गॅसची शेगडी चालू करताच गॅस गळती होऊन टाकीजवळ असलेल्या रेग्युलेटरने ...
घाटनांद्रा : येथे गुरुवारी दुपारी चहा ठेवण्यासाठी वृद्ध महिलेने गॅसची शेगडी चालू करताच गॅस गळती होऊन टाकीजवळ असलेल्या रेग्युलेटरने पेट घेतला. आसपासच्या नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यात चार ते पाच हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
घाटनांद्रा येथील जयराम हैबती मोरे यांनी गुरुवारी नवीन गॅस सिलिंडर भरून आणले होते. त्यांच्या घरातील वृद्ध महिलेने दुपारी चहा बनविण्यासाठी शेगडी सुरू करताच गॅस गळती होऊन टाकीजवळील रेग्युलेटरने पेट घेतला. आग मोठी असल्याने वृद्ध महिलेने घरातील सर्वांना बाहेर काढून अंगणात जाऊन आरडाओरड केली. यानंतर शेजारी-पाजारी धावून आले.
त्यांनी लगेच पेट घेतलेल्या टाकीवर पाणी व ओले अंथरूण टाकून तसेच पाण्याची मोटार लावून काही मिनिटांत आग विझवली, यामुळे मोठा अनर्थ टळला. तोपर्यंत घरातील किराणा साहित्यासह इतर असे संसारोपयोगी असे चार ते पाच हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
220721\img-20210722-wa0044.jpg
घाटनांद्रा येथील गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने साहित्याचे झालेले नुकसान.