ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळेच गॅस्ट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:24 AM2017-11-15T00:24:14+5:302017-11-15T00:24:25+5:30

छावणी भागातील साडेतीन हजारहून अधिक नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. महापालिका अधिका-यांनी मंगळवारी दिवसभर संपूर्ण जलवाहिन्यांची पाहणी करून आपला अहवाल सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केला.

 Gastro due to drainage mixed water | ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळेच गॅस्ट्रो

ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळेच गॅस्ट्रो

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी भागातील साडेतीन हजारहून अधिक नागरिकांना ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो झाल्याचे समोर आले आहे. महापालिका अधिका-यांनी मंगळवारी दिवसभर संपूर्ण जलवाहिन्यांची पाहणी करून आपला अहवाल सायंकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांना सादर केला. नागरी वसाहतींसाठी टाकण्यात आलेली एक जलवाहिनी चक्क नाल्यातून गेली आहे. नाल्यातील पाणी जलवाहिनीत गेल्याचा निष्कर्ष मनपाच्या चौकशी अधिकाºयांनी काढला आहे.
शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी मंगळवारी दिवसभर मनपा आणि छावणी परिषदेच्या जलवाहिन्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. महापौर बंगल्याच्या दक्षिणेपासून काही अंतरावर मनपाच्या १४०० आणि ७०० मि.मी. व्यासावरून छावणीसाठी दोन स्वतंत्र जोडण्या देण्यात आल्या आहेत. ३०० आणि ३५० मि.मी. व्यासाच्या लाइनद्वारे पुढे छावणीत पाणी जाते. एक लाइन लष्करी भागात तर दुसरी लाइन नागरी वसाहतीसाठी आहे. दरमहा ६० ते ६५ एमएलडी पाणी मनपा छावणी परिषदेला देते. इन्कमटॅक्स कार्यालयापासून आत एका नाल्यातून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला कोणतीही उंची देण्यात आलेली नाही. चक्क जमिनीवर टाकलेली आहे. दोन दिवस ही लाइन बंद होती. याच दरम्यान, दूषित पाणी जलवाहिनीत जिथे लिकेज असेल तेथून आत गेले असावे, असा अंदाज आहे. नेमके कोणत्या ठिकाणी पाणी आत गेले हे तपासण्यासाठी मंगळवारपासून संपूर्ण जलवाहिनी उघडून पाहण्यात येत आहे. महापालिका यातील दोष शोधून छावणी परिषदेला जलवाहिनीही दुरुस्त करून देणार असल्याचे महापौरांनी नमूद केले. लष्करी भागात गेलेल्या लाइनवरून पाणी पिल्याने कोणालाही गॅस्ट्रो झालेला नाही. फक्त नागरी वसाहतींमध्येच हा गंभीर प्रकार घडला आहे. ज्या ठिकाणी छावणी परिषदेला जलकुंभ आहे, तेथे क्लोरिन तपासण्याचे कोणतेही साधन नाही. क्लोरिन टाकण्याची कोणतीही व्यवस्था नाही. भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून परिषदेला काही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title:  Gastro due to drainage mixed water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.