छावणी परिसरात गॅस्ट्रोचे सावट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:28 PM2017-11-16T23:28:58+5:302017-11-16T23:29:03+5:30
छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. शुद्ध पाण्याच्या पुरवठ्याबरोबर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने छावणी परिसरात गॅस्ट्रोचे सावट कायम आहे. रुग्णसंख्या ५ हजारांवर गेली आहे. एकच रुग्ण पुन्हा येत असल्याने हा आकडा वाढत असल्याचे छावणी परिषदेचे म्हणणे आहे; परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही वेळ येत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
छावणी सामान्य रुग्णालयात गुरुवारी (दि.१६) दिवसभरात बाह्यरुग्ण विभागात २२९ जणांवर उपचार करण्यात आले, तर ५२ रुग्णांना सलाइन लावण्यात आल्या. रुग्णालयात उपचार घेतलेल्यांची संख्या ५ हजार ४१ वर पोहोचली आहे. सुरुवातीच्या (पान ५ वर)