१२ व्यादिवशी गॅस्ट्रोचे नऊ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:23 AM2017-11-23T00:23:08+5:302017-11-23T00:23:08+5:30
छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणाºया गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १२ व्या दिवशी बुधवारी (दि.२२) शून्यावर आली. दिवसभरात एकाही रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले नाही, तसेच बाह्यरुग्ण विभागात केवळ ९ रुग्ण आले. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसते.
औरंगाबाद : छावणी सामान्य रुग्णालयात दाखल होणाºया गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या १२ व्या दिवशी बुधवारी (दि.२२) शून्यावर आली. दिवसभरात एकाही रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आले नाही, तसेच बाह्यरुग्ण विभागात केवळ ९ रुग्ण आले. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसते.
छावणी सामान्य रुग्णालय बुधवारी ‘ओपीडी’मध्ये केवळ ९ रुग्ण आले. एकाही रुग्णास सलाइन लावण्यात आले नाही. त्यामुळे कोणताही रुग्ण रुग्णालयात दाखल झाला नसल्याचे आरएमओ डॉ. गीता मालू यांनी सांगितले. परिस्थिती नियंत्रणात असल्याने इतर विभागांकडून रुग्णालयात पाठविण्यात येणारे डॉक्टर थांबविण्यात आले आहेत. त्यामुळे छावणी सामान्य रुग्णालयातील डॉक्टर उपचार पार पाडत आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने कोणतीही अडचण येत नसल्याचे त्यांनी सांगितले. छावणी परिसरातील पाणीपुरवठा बाराव्या दिवशी सुरू करण्यात आला आहे. गेले काही दिवस पाणीपुरवठा बंद होता. तरीही नागरिकांना गॅस्ट्रोची लागण होत होती. अशा परिस्थितीत परिसरातील काही घरांमधील जारच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते.